Tuesday, September 8, 2026
Homeभंडारामोहफुल वेचत असतांनाच वाघाचा हल्ला; एकजण ठार..

मोहफुल वेचत असतांनाच वाघाचा हल्ला; एकजण ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच वाघाने एका नागरिकास यमसदनी धाडल्याची घटना घडल्याने नागरिकांनी घटनेप्रती तीव्र संताप व्यक्त केला आहे. मोहफुल वेचण्यासाठी शेतशिवारात गेलेल्या एका ५० वर्षीय इसमावर वाघाने अचानकपणे हल्ला चढवून ठार केल्याची घटना आज,गुरुवार १९ मार्च रोजी दुपारच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या उमरझरी-बाम्पेवाडा जंगल परिसरात उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.वसंत गणपत मेश्राम वय ५० वर्षे, रा.बाम्पेवाडा,ता.साकोली,जि.भंडारा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.सध्या ग्रामीण भागातील बऱ्याच ठिकाणी मोहफुल वेचणीचा हंगाम सुरू आहे.सकाळच्या सुमारास मोहफुल वेचने व गोळा केलेली मोहफुले वाळवून काही कालावधीनंतर त्यांची विक्री करून दोन पैसे उदरनिर्वाहासाठी लावणे,अशी हंगामी रोजीरोटी ग्रामीण भागातील नागरिक करीत असतात.अश्याच प्रकारे वसंत मेश्राम हे आज गुरुवारी सकाळच्या सुमारास शेतालगत असलेल्या मोहाच्या झाडाची मोहफुले वेचण्यासाठी गेले होते.शेत जंगल परिसराला लागूनच असल्याने मोहफुल वेचत असतांनाच अचानकपणे वाघाने वसंत मेश्राम यांच्यावर हल्ला चढवला आणि ठार केले.इकडे घरची मंडळी वसंत मेश्राम यांची घरी परतण्याची वाट पाहत होते. सकाळपासून मोहफुले वेचण्यासाठी गेलेले वसंत मेश्राम हे घरी न परतल्याने कुटूंबीय तसेच ग्रामस्थांनी शेत शिवारात तसेच जंगल परिसरात शोधाशोध केली असता काही अंतरावरच त्यांचा मृतदेह आढळून आला.घटनेची माहिती वन विभागास देण्यात आली.दरम्यान,घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी व पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून पुढील तपासाची कारवाई करण्यात आली.घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!