Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरअखेर 'त्या' तरुणाची ओळख पटली; शेतशिवारात आढळला होता मृतदेह..

अखेर ‘त्या’ तरुणाची ओळख पटली; शेतशिवारात आढळला होता मृतदेह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गाव नजीकच्या शेतशिवारात काल,बुधवार १८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती.घटनेची माहिती होताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आणि सिंदेवाही पोलिसांना कळवले.लागलीच
सिंदेवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार कांचन पांडे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले व मृतदेहाची पाहणी करून परिसरातील ओळखीचा तरुण असल्यास कळविण्याचे आवाहन केले होते.प्रसंगी उपस्थित नागरिकांनी सदर तरुण परिसरातील नसल्याचे स्पष्ट करताच पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला होता.सिंदेवाही पोलिसांकडून मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू असतांनाच तीन दिवसांपूर्वी कामाच्या शोधात निघालेला आपला मुलगा तर नसावा ना?अशी शंका मनात बाळगून पोलीस ठाण्यात धाव घेतलेल्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले आणि मृताची खरी ओळख पटली.धनराज दिवाकर दांडेकर वय ३५ वर्षे,रा.नलेश्वर, ता.सिंदेवाही,जि.चंद्रपूर असे मृतक तरुणाचे नाव असून तो तीन दिवसांपूर्वी कामाच्या शोधात घरून निघाला होता.याबाबत त्याने आपल्या आईला सांगितले होते.अश्यातच काल बुधवारी लाडबोरी शेत शिवारात त्याचा मृतदेह सापडला.
आज गुरुवारी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.धनराजला दारूचे व्यसन जडले होते.सदरची घटना दारूच्या नशेत तर घडली नसावी ना?असा कयास बांधला जात आहे. मात्र,मृत्यूचे खरे कारण उत्तरीय तपासणी अहवालातून  स्पष्ट होणार असून तरुण वयात मुलगा हरपल्याने दांडेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!