Thursday, October 22, 2026
Homeचंद्रपूरवाघाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी..

वाघाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र संपता- संपेना,असे चित्र निर्माण झाले आहे.जंगल परिसरात गेलेल्यांना वाघोबा तर सोडतच नाही.अश्यातच वाघ
आता चक्क शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचाही जीव घेऊ पाहत असल्याने “इकडे आड अन् तिकडे विहीर” अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.शेतातील कामात व्यस्त असतांनाच एका पट्टेदार वाघाने ६५ वर्षीय शेतकऱ्यावर अचानकपणे हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवार २१ ऑक्टोंबर रोजी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास गिरगाव शेत शिवारात घडली.देवाजी पांडुरंग वाढई वय ६५ वर्षे, रा.गिरगाव,ता.नागभीड,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकरी देवाजी वाढई हे बुधवारच्या सकाळी शेतावर गेले होते.दरम्यान,शेतातील धूऱ्यावरील गवत कापत असतांनाच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला चढवला.अचानक झालेल्या हल्ल्याने देवाजी यांनी आरडाओरड केली. त्याचवेळेस जवळच्याच शेतात धान कापणी करणाऱ्या महिला जोरजोरात ओरडू लागल्याने वाघाने घटनास्थळावरून पळ काढला.यामुळे मोठा अनर्थ टळला.मात्र,घडलेल्या या चित्तथरारक घटनेने उपस्थितांच्या मनात धडकी भरली.हल्ल्यात देवाजी वाढई हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  अमरावती :-एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज,बुधवार २१ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास अमरावती शहरात उघडकीस...

पदवीधर मतदारसंघ निवडणूक; आता खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत.. -जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून निवडणूक साहित्य वाटप व्यवस्था व स्ट्राँग रूमची पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या दोन तासांऐवजी आता चार...

शाळांना ‘या’ तारखेपासून लागणार दिवाळीच्या सुट्ट्या..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ लोकनाट्यास सातवा राज्यस्तरीय पुरस्कार.. – मुंबई येथे होणार सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठान,चेंबूर(मुंबई) या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना प्रतिष्ठानच्या वार्षिक साहित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!