Wednesday, October 21, 2026
Homeगडचिरोलीचुडाराम बल्हारपुरे यांच्या 'जत्रा घडली नागोबाची' लोकनाट्यास सातवा राज्यस्तरीय पुरस्कार.. - मुंबई...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ लोकनाट्यास सातवा राज्यस्तरीय पुरस्कार.. – मुंबई येथे होणार सत्कार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठान,चेंबूर(मुंबई) या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना प्रतिष्ठानच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राष्ट्रीय स्तरावर अत्यंत मानाचा व दर्जेदार समजला जाणाऱ्या या पुरस्काराकरीता मराठी नाट्य साहित्य प्रकारात विदर्भातील प्रसिध्द नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री पुणे प्रकाशित ‘जत्रा घडली नागोबाची ‘ या लोकनाट्यास यंदाचे नाट्यलेखनाचे पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठानचे विश्वस्त व संस्थापक आनंद सांडू यांनी कळविले असून मुंबईच्या चेंबूर येथील सांडूवाडी प्रतिष्ठानात लवकरच हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र व सन्मानपत्र असे आहे.
विशेष म्हणजे,या नाटकास यापूर्वी साहित्य विहार संस्था,नागपूर यांचा डॉ.प्रज्ञा निनावे पुरस्कृत उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार-२०२५,(२) अ.भा‌.मातोश्री जिजाऊ परिवर्तन सामाजिक शिक्षण संस्था,गोंदिया यांचे नटसम्राट पुरस्कार-२०२६,(३)यशदा पुणे,संवाद  पुणे,पुणे महानगर पालिका व मराठी भाषा संवर्धन समिती,पुणे यांचे उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार-२०२६.(४)शिवांजली साहित्यपीठ,चाळकवाडी (ता. जुन्नर,जि.पुणे)यांचा स्व.सयाजी चाळक स्मृती उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार-२०२६ व (५) महाराष्ट्र साहित्य परिषद,शाखा- दामाजीनगर यांचा शहिद राजकुमार ठोंबरे स्मृती उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार-२०२६ व (६) स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी (जि.सातारा) यांचे श्री राजाराम डाकवे (तात्या) स्मृती पुरस्कार- २०२६ असे सहा पुरस्कार प्राप्त झाले असून हा सातवा पुरस्कार आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल आनंद इंदिरा श्रीधर सांडू(साहित्यिक),मधुश्री प्रकाशनचे प्रकाशक पराग लोणकर व नाट्यश्रीच्या तसेच झाडीपट्टीच्या कवी,साहित्यिक व कलावंतांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जेवणातून विषबाधा; शेकडो नागरिक रुग्णालयात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील खराशी गावात दुर्गोत्सवाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.अनेक नागरिकांना उलट्या,मळमळ आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने...

उद्याला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ अंतर्गत जनजागृती सत्राचे आयोजन.. – विद्यार्थी व नवउद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण विचार, सर्जनशीलता,समस्या निवारणाची क्षमता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज...

आंघोळीसाठी तलावात उडी; दोघेजण बचावले..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या अंबाझरी तलावात आंघोळीसाठी उडी मारलेले दोन युवक बुडता-बुडता बचावले.विशेष म्हणजे,धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम नागरिकांच्या सुरक्षेसाठी...

शेतात धान कापण्यासाठी गेली ती परतलीच नाही; वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातून ऐन सणाच्या दिवशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शेतावर धान कापणीसाठी गेलेल्या वृध्द महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!