- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासन यांच्या संयुक्त निधीतून राबविण्यात येणाऱ्या ५१ व्या ग्रंथभेट योजनेसाठी निवडलेल्या १ हजार १८३ ग्रंथांची यादी ग्रंथालय संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.या यादीबाबत सूचना,हरकती अथवा आक्षेप ३१ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत नोंदविता येणार आहेत.
सन २०२४ मध्ये प्रकाशित व ग्रंथालय संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी या ग्रंथांची निवड केली आहे.यामध्ये मराठीतील ६८५,हिंदीतील २४६ आणि इंग्रजीतील २५२ ग्रंथांचा समावेश आहे.ही यादी “www.dol.maharashtra.gov.in” (https://www.dol.maharashtra.gov.in)या संकेतस्थळावर १६ ते ३१ ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत अवलोकनासाठी उपलब्ध आहे.
यादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत सूचना,हरकती किंवा आक्षेप असल्यास,तसेच ग्रंथाचे नाव,लेखक,प्रकाशक व किंमत यामध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास, संबंधितांनी ३१ ऑक्टोंबरपर्यंत ग्रंथालय संचालक,ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,नगर भवन, मुंबई–४००००१ या पत्त्यावर लेखी स्वरूपात कळवावे.मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांचा विचार केला जाणार नसल्याचे शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
- Advertisement -

