Saturday, October 17, 2026
Homeगडचिरोलीविविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (NSP)आणि राज्य शासनाच्या महाडीबीटी २.० पोर्टलवर नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पात्र विद्यार्थ्यांनी त्यांना लागू असलेल्या योजनेनुसार संबंधित पोर्टलवर अर्ज करावेत,असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.सचिन मडावी यांनी केले आहे.
  • मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी अर्ज👇
इयत्ता नववी व दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या पात्र मुला-मुलींनी ‘पीएम यशस्वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना—ओबीसी,ईबीसी व डीएनटी विद्यार्थी’ या योजनेसाठी एनएसपी पोर्टलवर अर्ज नोंदवावेत.
इयत्ता पाचवी ते आठवीमधील पात्र मुलींनी,तसेच नववी व दहावीमधील पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या पात्र मुलींनी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडीबीटी २.० पोर्टलवर अर्ज करावेत.
याशिवाय माध्यमिक शाळांमधील विमुक्त जाती व भटक्या जमाती(विजाभज)आणि विशेष मागास प्रवर्गातील(विमाप्र) विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती (जिल्हा परिषद),केवळ मुंबईसाठी लागू असलेली गुणवत्ता शिष्यवृत्ती,तसेच सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता या योजनांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर भरावेत.खासगी विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारक पात्र विद्यार्थ्यांनी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेसाठी याच पोर्टलवर अर्ज करावेत.
  • मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज👇
दहावीनंतर शिक्षण घेणारे इतर मागासवर्गीय(इमाव), विमाप्र व विजाभज प्रवर्गातील पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनी,तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या इतर मागासवर्गीय मुलींसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज नोंदणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.सन २०२५-२६ मध्ये अभ्यासक्रम सुरू झालेल्या आणि पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी ‘पीएम यशस्वी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना— ओबीसी,ईबीसी व डीएनटी विद्यार्थी’ या योजनेसाठी केवळ एनएसपी पोर्टलवर अर्ज नोंदवावेत.
  • महाडीबीटीवरील इतर मॅट्रिकोत्तर योजना👇
इयत्ता अकरावी व बारावीमधील विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती,तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या व संबंधित महाविद्यालयाशी संलग्न वसतिगृहात राहणाऱ्या विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता या योजनांचे अर्ज महाडीबीटी २.० पोर्टलवर भरावेत.
इमाव,विमाप्र व विजाभज विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती,शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती(फ्रीशिप),तसेच शासकीय किंवा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये(आयटीआय) प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शुल्क परतफेड योजनेचे अर्जही महाडीबीटी पोर्टलवर नोंदवावेत.
मागील शैक्षणिक सत्रात भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेले,पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असलेले आणि सन २०२६-२७ मध्ये त्याच संस्थेत तृतीय,चतुर्थ अथवा पुढील वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नूतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी २.० पोर्टलवर भरावेत.
  • एनएसपीवरील अर्जांची मुदत👇
एनएसपी पोर्टलवर विद्यार्थी अर्ज नोंदणीची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२६,तर शाळा व महाविद्यालय स्तरावर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२६ आहे.
जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी संबंधित योजनेच्या निकषांनुसार योग्य पोर्टलवर मुदतीत अर्ज करावेत. शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी आवश्यक मार्गदर्शन करून विहित मुदतीत पडताळणी पूर्ण करावी,असे आवाहन डॉ.मडावी यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!