- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.त्यात वाठोडा,धामणगाव,आमला,वाघधरा,बेलगाव, झाडगाव,लोणसावळी,शेकापूर,जोगाधरी आणि वायफड या गावांचा समावेश आहे.या गावांमध्ये वाघाचा सततचा वावर असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही जिकिरीचे झाले आहे.खबरदारीचा उपाय म्हणून वाघाच्या सुरक्षिततेसाठी आणि परिसरातील नागरिकांच्या संरक्षणासाठी प्रादेशिक वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र परिसरातील जंगल पिंजून काढत आहेत.अत्याधुनिक यंत्रणेद्वारे आणि प्रत्यक्ष गस्तीव्दारे वाघाच्या प्रत्येक हालचालीवर अत्यंत बारीक लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस शेतात जाणे टाळावे,जंगल परिसरात तसेच शेतात जातांना एकटे जाणे टाळून नेहमी समूहाने जावे,जनावरांच्या गोठ्यांची आणि घरांच्या आसपास विशेष काळजी घ्यावी; असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
- Advertisement -

