Friday, June 19, 2026
Homeवर्धाचालत्या दुचाकीवर वीज कोसळून बापलेकाचा मृत्यू.. - दुसऱ्या घटनेत एका शेतकऱ्याचा मृत्यू..

चालत्या दुचाकीवर वीज कोसळून बापलेकाचा मृत्यू.. – दुसऱ्या घटनेत एका शेतकऱ्याचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.अश्यातच सायंकाळच्या सुमारास तिघेजण दुचाकीवरून जात असतांनाच चालत्या दुचाकीवर वीज पडून बापलेकाचा मृत्यू झाला,तर पुतण्या गंभीर जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास वर्धा-हिंगणघाट मार्गावरील धोत्रा चौरस्ता येथे घडली.भिवापूर येथील अनिल दत्तूजी ठाकरे हे त्यांचा १७ वर्षीय मुलगा वेदांत अनिल ठाकरे आणि पुतण्या सौरभ गजानन ठाकरे याच्यासोबत भर पावसात सोनेगाव मार्गाने आपल्या दुचाकीने भिवापूर येथून एका कार्यक्रमासाठी चारमंडळ गावाकडे जात होते.दरम्यान,धोत्रा चौरस्ता येथे येताच अचानकपणे विजांचा कडकडाट झाला आणि दुचाकीवर वीज पडली.यात वडील अनिल ठाकरे आणि मुलगा वेदांत ठाकरे हे जागीच ठार झाले.तर पुतण्या सौरभ ठाकरे हा गंभीर जखमी झाला.त्याला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
दुसरी घटना ही भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सोदेपूर गावच्या शेतशिवरात घडली असून शेतात काम करत असतांनाच अंगावर वीज पडून एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.यात रघुनाथ इसान उईके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!