Monday, August 31, 2026
Homeवर्धाआंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू..

आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील वणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, शुक्रवार २९ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. मृतांमध्ये अतुल लक्षमन किनकर वय ४५ वर्षे,त्यांची १६ वर्षीय मुलगी रिद्धिमा अतुल किनकर व मुलीची मैत्रीण गुंजन रमेश मेश्राम वय १६ वर्षे सर्व रा.शेडगाव,ता.समुद्रपूर, जि.वर्धा अशी मृतकांची नावे आहेत.तिघेही अधिक मासानिमित्त नदी तीरावर आंघोळीसाठी गेले असता सदरची दुर्दैवी घटना घडली.नदीत आंघोळ करत असतांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.सदरची माहिती गावात कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली.दरम्यान,पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.यावेळी शोध मोहीम राबवण्यात आली.काही वेळाने तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.घटनास्थळी एसडीएम आकाश अवथरे, तसीलदार कपिल हाटकर,एसडीपीओ सुशिलकुमार नायर,पीआय अनिल ठाकूर,समुद्रपूरचे ठाणेदार रवींद्र रेवतकर,गिरडचे ठाणेदार विकास गायकवाड यांनी भेट दिली.तिन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!