Friday, May 29, 2026
Homeदेसाईगंजकुरुडच्या बोडेगाव रेती घाटात अवैध उत्खनन जोमात; देसाईगंज महसूल विभाग कोमात..

कुरुडच्या बोडेगाव रेती घाटात अवैध उत्खनन जोमात; देसाईगंज महसूल विभाग कोमात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-शासनाने रेतीघाट लिलाव केलेय खरी,पण अवैधरित्या वाळूची चोरी करणाऱ्या चोरट्यांपेक्षा काही रेतीघाटधारकच महाचोरटे असल्याचा प्रकार आज,शुक्रवार २९ मे रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड गावच्या बोडेगाव रेतीघाटात उघडकीस आल्याने अवैध उत्खनन जोमात,तर देसाईगंज महसूल विभाग कोमात गेल्याचे चित्र दिसून येत आहे.ना भुरी मांजर लक्ष घालतेय,ना कालू भाऊ भटकून पाहतो. आश्चर्याची बाब म्हणजे,वाळू उत्खननाची वेळ संपूनही रेतीघाटात आठ ते दहा ट्रॅक्टर अवैधरीत्या रेती उत्खनन करून त्याची वाहतूक साठवणूक केलेल्या ठिकाणी करीत होते.त्यामुळे,ग्रामीण भागात अवैध रेतीचा उपसा तसेच अवैधरीत्या रेतीची चोरी करणाऱ्या चोरट्यांवर अंकुश घालण्यासाठी महसूल विभागाचे पथक खरोखरच जिवंत आहेत काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बोडेगाव रेती घाटात अवैध उत्खनन जोमात तर आहेच, याशिवाय रेती घाटाजवळ लागूनच एका शेतालगतच्या आडोशात जेसीबी ठेवलेली आढळून आल्याने रात्रीच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने अवैध रेती उपसा करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.कारण की,ना भुरी मांजर लक्ष घालतेय,ना कालू भाऊ भटकून पाहतो. एवढा सारा प्रकार घडत असतांनाही “ना हाक ना बोंब” म्हणजेच “आम्ही खुश तर तुम्ही खुश” अशीच करून कहाणी समजावी लागेल.नागरिकांच्या तक्रारीनुसार गडचिरोली जिल्हाधिकारी रेती घाटांची चौकशी लावतात. पण इकडे सर्व मिलीभगत असल्याने अवैध उपशावर पांघरून घातले जातेय,हे रेती घाटातील सारवा-सारव केलेल्या प्रकारावरून स्पष्टपणे निदर्शनास येते.अवैध उत्खनन सुरू असल्याबाबत कुरुड येथील अतिरिक्त पदभार असलेले पी.एस.कुमरे यांना माहिती दिली असता,मी आता जाऊन येतो आणि बघतो,असे सायंकाळचे साडेसात वाजे सांगितले.आता ते खरोखरच रेती घाटावर गेले की काय?अन् सुरू असलेला अवैध उत्खनन बंद केला की काय? नाहीतर आज जातील अन् उद्या पूर्ववत सुरू,म्हणजेच ‘जशीची लंका तशीच’ असे व्हायला नको.नाहीतर याविरोधात आवाज बुलंद करण्याचा इशारा सुजाण नागरिकांनी दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अत्यंत कठीण परिस्थितीतही आम्ही प्रामाणिकपणे आरोग्य सेवा दिली; मात्र आता मानधनाशिवाय सेवा देणे अशक्य झाले आहे.. – पेसा बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)पेसा पदभरतीमधील मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत बिनपगारी कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला...

साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा.. – तुमच्या परवानगीशिवाय मिटर बदलताच येत नाही..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात वीज वितरण कंपनीने मागील काही महिन्यांपासून साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा सुरू केला आहे.मात्र,वीज वितरण...

गडचिरोलीतील १२० विद्यार्थी दिल्लीकडे रवाना..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसह त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि राष्ट्रीय स्तरावरील...

जनता महागाई,बेरोजगारी आणि इंधन दरवाढीने त्रस्त असतांना सरकारची नुसती इव्हेंटबाजी- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-देशातील जनता महागाई,बेरोजगारी,इंधन दरवाढ आणि आर्थिक अस्थिरतेने त्रस्त असतांना केंद्रातील सरकार धार्मिक ध्रुवीकरण आणि इव्हेंटबाजीच्या माध्यमातून अपयश लपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!