Tuesday, September 1, 2026
Homeभंडारालाखांदूर-देसाईगंज मार्गावर पेटत्या कारचा थरार..

लाखांदूर-देसाईगंज मार्गावर पेटत्या कारचा थरार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर-देसाईगंज मार्गावरील दुर्गा माता मंदिर पहाडीजवळ भर उन्हात पेटत्या कारचा थरार काल शुक्रवारी घडला.लाखांदूरहून निघालेली कार सोनी-चप्राळ पहाडीजवळ येताच धावत्या कारच्या समोरील टायर अचानक फुटल्याने कार मार्गावरच पलटी झाली.पलटी होताच कारने अचानकपणे पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण कार भस्मसात झाली.सुदैवाने जीवितहानी टळली,मात्र कारमालकाचे मोठे नुकसान झाले आहे.मंगेश मधुकर राऊत वय ३३ वर्षे,रा.सोनी, ता.लाखांदूर,जि.भंडारा असे कार चालकाचे नाव ते एमएच ३३ व्ही ४१३५ क्रमांकाच्या कारने शुक्रवारी दुपारच्या सुमारास लाखांदूरहून स्वगावी जाण्यासाठी निघाले होते.चप्राळ पहाडीजवळ येताच कारचा अचानक समोरील टायर फुटला. कार भरधाव वेगात असल्याने मंगेश यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्यावरच पलटी झाली.कार उलटताच इंजिनमधून धूर निघू लागला आणि अचानक मोठी आग लागली.तत्पूर्वी चालक मंगेश राऊत कारमधून निघताच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण कार आगीच्या विळख्यात आली.लाखांदूर पोलीस ठाण्यास घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले व तात्काळ लाखांदूर नगरपंचायतच्या अग्निशामक दलाच्या वाहनाला पाचारण करण्यात आले.अग्निशामक पथकाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली,तोपर्यंत संपूर्ण कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!