Sunday, September 20, 2026
Homeवर्धाशेतीच्या हिस्सेवाटणीचा वाद टोकाला गेला; माय-लेकाची हत्या करून स्वतःही केले विष प्राशन.....

शेतीच्या हिस्सेवाटणीचा वाद टोकाला गेला; माय-लेकाची हत्या करून स्वतःही केले विष प्राशन.. – सकाळच्या घटनेने परिसर हादरला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

वर्धा :-जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर ठाण्यांतर्गत येणाऱ्या निमसडा गावात शेतीच्या हिस्सेवाटणीचा वाद टोकाला जाऊन झालेल्या वादात  सख्ख्या पुतण्याने काकू व चुलत भावाची कुऱ्हाडीने वार करुन हत्या करून स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज,शनिवार २८ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास निमसडा गावातील शेत शिवारात घडली.साधना सुभाष मोहिजे वय ४७ वर्षे रा.निमसडा,नितीन सुभाष मोहिजे वय २७ वर्षे रा.निमसडा अशी मृतांची नावे असून आरोपी  पुतण्या महेंद्र भाऊराव मोहिजे वय ४८ रा.निमसडा असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे.घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून घटनेची माहिती मिळताच अल्लीपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वर्धेचे पोलिस अधीक्षक अनुराग जैन सह अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल चौहन तातडीने निमसडा गावात दाखल झाले.घटनेतील संपूर्ण स्थितीचा आढावा घेत तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा जिल्हा रुग्णालयात पाठवले.प्रकरणी पोलिस मृतांचे शेजारी व नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेत आहेत.हल्ली शेतीचा हंगाम सुरू असल्याने मृत साधना आणि तिचा मुलगा नितीन आज सकाळच्या सुमारास शेतावर गेले होते.आरोपी महेंद्र हा सुद्धा शेतावरच होता.पूर्वीपासूनच तिघांमध्ये शेतीचा वाद सुरू होता. अश्यातच परत पुन्हा आज शनिवारी सकाळच्या सुमारास तिघांमध्ये शेतीची हिस्सेवाटणी व इतर कारणांवरून  वाद झाला.वाद सुरू असतांनाच आरोपी महेंद्र याने रागाच्या भरात हातातील कुऱ्हाडीने साधना आणि तिचा मुलगा नितीन यांच्यावर वार केले. यात दोघांचाही मृत्यू झाल्याने आरोपी महेंद्र याने घटनास्थळावरून पळ काढत विष प्राशन केले.त्याला तात्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.मात्र,उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.घटनेने संपूर्ण वर्धा जिल्हा हादरून गेला असून केवळ शेतीचा वाद तिघांच्या मृत्यूचे कारण ठरल्याने संपूर्ण परिसरात सदरचा हत्याकांड एकच चर्चेचा विषय ठरू लागला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

आता शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारेही करता येणार ई-पीक पाहणी नोंदणी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाकडून महसूल विभागातील सहाय्यकांकडून ११ ऑगस्ट २०२६ पासून खरीप ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.मात्र,काही तांत्रिक समस्येमुळे पीक पाहणीची प्रक्रिया अतिशय...

उद्याला गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाची खरीप शिवार फेरी.. – एकाच ठिकाणी २२८ पीक वाण व तंत्रज्ञान शिफारशींची प्रात्यक्षिके व शास्त्रज्ञांशी थेट संवादाची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला,कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने २० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!