Sunday, September 20, 2026
Homeचंद्रपूरक्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा मृत्यू झाला.ही घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील चिचबोडी गावात काल शनिवारच्या रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.दिलीप मुकरू मलोडे वय ३० वर्षे असे आरोपी मुलाचे नाव असून घटनेनंतर तो फरार झाला आहे.तर मुकरू कवडू मलोडे वय ५५ वर्षे असे मृतक वडिलाचे नाव आहे.
सावली तालुक्याच्या चिचबोडी येथे वास्तव्यास असणारे मुकरू मलोडे हे मिळेल ते काम करून आपला गुजारा करतात.अश्यातच मुलगा दिलीप हा बेरोजगार असल्याने कामाच्या शोधात होता.मात्र, मागील काही दिवसांपासून मुकरू मलोडे आणि दिलीप यांच्यात जेवणाच्या कारणावरून शाब्दिक बाचाबाची व्हायची.अश्याच प्रकारे काल शनिवारच्या रात्रीही दोघांमध्ये बाचाबाची झाली. यात मुलाचा राग अनावर झाला आणि त्याने हातात काठी पकडुन वडिलांना काठीने बेदम मारहाण केली. यात मुकरू मलोडे हे गंभीर जखमी झाले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच सावली पोलिसांचे पथक घटनास्थळी झाले व मुकरू यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.मारहाणीनंतर आरोपी मुलगा दिलीप मलोडे हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी सावली पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

आता शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारेही करता येणार ई-पीक पाहणी नोंदणी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाकडून महसूल विभागातील सहाय्यकांकडून ११ ऑगस्ट २०२६ पासून खरीप ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.मात्र,काही तांत्रिक समस्येमुळे पीक पाहणीची प्रक्रिया अतिशय...

उद्याला गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाची खरीप शिवार फेरी.. – एकाच ठिकाणी २२८ पीक वाण व तंत्रज्ञान शिफारशींची प्रात्यक्षिके व शास्त्रज्ञांशी थेट संवादाची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला,कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने २० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६...

आता प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव.. – डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विकणाऱ्या दुकानदारांना बसणार चाप..

उद्रेक न्युज वृत्त :-आता देशातील प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.विशेष म्हणजे,भारताच्या सर्वोच्च औषध सल्लागार संस्थेने देशभरातील प्रत्येक केमिस्ट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!