- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-बेकायदेशीररीत्या डीजे व साऊंड सिस्टीम वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग व प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या डीजे मालक व ऑपरेटर आणि चालक यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २२३ व महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून ध्वनीप्रदूषण पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ वाहनासह संपूर्ण डीजे साहित्य ताब्यात घेतले.या कारवाईत पोलिसांनी १ लाख रुपयांचे डायनॉटीक कंपनीचे २ साऊंड टॉप,२ लाखांचे क्रीश कंपनीचे ४ साऊंड बेस, ४ लाखांची क्राउन कंपनीची १ मशीन,२० हजारांचा कॉईनर मिक्सर,१ लाखाचा किर्लोस्कर जनरेटर आणि ८ लाख रुपये किंमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण १२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सोमवार १४ सप्टेंबर रोजी राजुरा शहरातील नवीन बस स्टॉपसमोर एका वाहनावर बेकायदेशीर डीजे सिस्टीम सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता,महिंद्रा बोलेरो पिकअप क्र.एमएच ३४ बीझेड ५०१७ वाहनावर मोठ्या आवाजात डीजे सिस्टीम लावून वाजवण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून आले.पोलिसांनी वाहनचालक व मालकाकडे डीजे वाजवण्याबाबतच्या अधिकृत शासकीय परवान्याची विचारणा केली.मात्र, त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे समोर आले.सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून ध्वनीप्रदूषण पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ वाहनासह संपूर्ण डीजे साहित्य ताब्यात घेतले. याप्रकरणी रवी सतीश एकनकर वय २८ वर्षे, रा.फुलसिंग नाईक वार्ड,बल्लारशा,जि.चंद्रपूर व सचिन इन्चुलाल सरोज वय २२ वर्षे,रा.पंडित दीनदयाल वार्ड,बल्लारशा यांना ताब्यात घेऊन सूचनापत्र देऊन सोडण्यात आले. सदरची कारवाई चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली राजुराचे ठाणेदार नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे,किशोर तुमराम,पोलीस हवालदार विक्की निवाण, अनुप डांगे,शफीक शेख,मिसल जांभुळे,रमेश बस्सी व राजीव दुबे यांच्या पथकाने
केली.
- Advertisement -

