Saturday, August 29, 2026
Homeगडचिरोलीआजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आज,मंगळवार १४ जुलै ते २८ जुलै २०२६ या १५ दिवसांच्या कालावधीत जमावबंदी आदेश लागू केले आहे.
जिल्ह्यात विविध ठिकाणी विनापरवानगी थोर महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण होत असल्याने सामाजिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये,या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या आदेशानुसार शस्त्रे,दाहक अथवा स्फोटक पदार्थ बाळगणे,आक्षेपार्ह घोषणा,प्रक्षोभक भाषणे,फलक अथवा प्रतिमांचे प्रदर्शन यावर बंदी घालण्यात आली आहे.तसेच उपविभागीय दंडाधिकारी,कार्यकारी दंडाधिकारी किंवा संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतीही मिरवणूक,सार्वजनिक कार्यक्रम किंवा पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा सार्वजनिक ठिकाणी जमाव करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सदर आदेश आज १४ जुलै २०२६ रोजी मध्यरात्रीपासून ते २८ जुलै २०२६ रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात लागू राहणार असल्याचे जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!