Saturday, August 29, 2026
Homeगडचिरोलीआता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या कलम १३८ अंतर्गत धनादेश अनादर(Cheque Bounce)प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी राज्यभर विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या १८ जुलै २०२६ व २१ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील उच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठांसह सर्व जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये विशेष लोक अदालत भरविण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातही अध्यक्ष,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय,गडचिरोली तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.या विशेष लोक अदालतीत न्यायालयात प्रलंबित असलेली तसेच न्यायालयात अद्याप दाखल न झालेली(दाखलपूर्व) धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने मिटविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विशेष लोक अदालतीच्या माध्यमातून संबंधित पक्षकारांना दीर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेपासून दिलासा मिळून वेळ,पैसा आणि श्रमांची बचत होणार आहे.तसेच परस्पर संमतीने वाद मिटल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सलोखा निर्माण होण्यास मदत होणार आहे.
दाखलपूर्व प्रकरणे विशेष लोक अदालतीत ठेवण्यासाठी इच्छुकांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली किंवा तालुका विधी सेवा समितीमार्फत अहेरी,आरमोरी, चामोर्शी,देसाईगंज,धानोरा,कुरखेडा व सिरोंचा येथील संबंधित न्यायालयांशी संपर्क साधावा.
न्यायालयात प्रलंबित तसेच दाखलपूर्व धनादेश अनादर प्रकरणांतील पक्षकारांनी विशेष लोक अदालतीचा लाभ घेऊन परस्पर समझोत्याद्वारे वाद मिटवावेत आणि या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!