- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :- ‘नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही’ अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या विविध भागात कोसळलेल्या पावसाने काहीकाळासाठी दडी मारल्याने विदर्भातील काही भागात खरीप पिके कोमेजू लागली आहेत.पिके वाचवण्यासाठी शेतकरी धडपडतांना दिसून येतो आहे. पाऊस लांबल्यास काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अश्या स्थितीत प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.त्यानुसार,आजपासून म्हणजेच बुधवार १५ जुलै रोजी राज्यातील काही भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि २० जुलैनंतर संपूर्ण राज्यात मान्सून पुन्हा पूर्ण क्षमतेने सक्रिय होऊन मुसळधार पावसाला सुरुवात होईल.पाऊस आणखी काही दिवस लांबणीवर गेल्यास दुबार पेरणीचे संकटही ओढावू शकते,त्यामुळे येणारा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.हवामान विभागाच्या या नवीन अंदाजामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.२० जुलैनंतर अपेक्षित असलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होईल,तसेच पावसाअभावी संकटात सापडलेल्या खरिपाच्या पिकांना जीवदान मिळेल,अशीही आशा आहे.अश्यातच विदर्भात आज प्रामुख्याने काही ठिकाणी कोरडे,तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. विदर्भातील जिल्ह्यासाठी आज अलर्ट देण्यात आलेला नाही.मात्र,उद्यागुरुवार १६ जुलैपासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
- Advertisement -

