Saturday, August 29, 2026
Homeदेसाईगंजपीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व...

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली कृतज्ञता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा’ येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी ‘एक राखी देशाचे संरक्षण करणाऱ्यांसाठी’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता,कलागुण,बंधुभाव, प्रेम,आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी वाढीस लागावी,या उद्देशाने शाळेत राखी मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध रंग,आकर्षक सजावटीच्या वस्तू आणि उपलब्ध साहित्याचा वापर करून सुंदर व कल्पक राख्या तयार केल्या.विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने तयार केलेल्या राख्यांमधून त्यांच्या कलात्मक कौशल्याचे दर्शन घडले.या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या घेऊन पोलीस स्टेशन देसाईगंज येथे भेट दिली.समाजाच्या सुरक्षिततेसाठी सदैव कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार व पोलीस शिपाई यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले.यावेळी देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्विन इजप्पवार यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले.विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या पोलिस बांधवांना बांधल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.तसेच रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा उत्साह वाढविला.विद्यार्थ्यांसाठी हा क्षण आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाच्या कार्याची ओळख झाली,तसेच “समाजाचे रक्षण करणारे पोलीस बांधव आणि त्यांच्याप्रती असलेला आपुलकीचा व कृतज्ञतेचा भाव” हा सुंदर सामाजिक संदेश देण्यात आला.
शाळेत आयोजित करण्यात आलेल्या राखी मेकिंग स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पनांना कलात्मक स्वरूप देण्याची संधी मिळाली.रक्षाबंधन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेम,स्नेह,परस्पर आदर आणि सामाजिक जाणीव निर्माण होण्यास मदत झाली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक किशोर चव्हाण, सहाय्यक शिक्षक  मुजाहिद पठाण,शिक्षक राजेश मडावी,शिवराम हाके, राहुल भैसारे,शिक्षिका अपेक्षा देशपांडे,सोनिया खरकाटे,विजय मुळे क्रीडाशिक्षक तसेच शालेय पोषण आहार मदतनीस मनीषा राऊत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम आनंददायी, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे तब्बल १० सराईत गुन्हेगार तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर येत  नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!