- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र न घेता व्यवसाय करणे कायद्याच्या कलम ६३ अन्वये दंडनीय गुन्हा आहे.त्यामुळे सर्वांनी नोंदणी व अन्न परवाना प्रमाणपत्र काढून घ्यावेत; अन्यथा कारवाई करण्यात येईल,असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
अन्नपदार्थांचा व्यवसाय करणारे स्टॉलधारक, पाणीपुरी,भेलपुरी,पावभाजी विक्रेते,आइस्क्रीम,बर्फ गोळा,ज्यूस,सरबत विक्रेते,भाजीपाला व फळ विक्रेते, किरकोळ किराणा,डेली नीड्स,बेकरी,घाऊक विक्री करणारे वितरक व वाहतूकदार,गृहउद्योग ते अन्नपदार्थांचे उत्पादक,तसेच उपहारगृह,हॉटेल, खानावळ,चहा विक्रेते,दूध विक्रेते त्याचबरोबर स्वस्त धान्य दुकानदार, कॅटरर्स,शालेय पोषण आहार पुरवठादार,बचत गट,शासकीय,अशासकीय कार्यालयांतील कँटीन, वसतिगृहातील खानावळ, धार्मिक ठिकाणी वितरित होणारा प्रसाद,मेळावे व प्रदर्शनामधील अन्नपदार्थांचे स्टॉलधारक इत्यादी सर्व अन्न व्यावसायिक या वर्गवारीच्या कक्षेत येणाऱ्या सर्वांनी परवाना घेणे आवश्यक आहे.अनेक ठिकाणी परवाना व नोंदणीधारक अन्न व्यावसायिक आहेत. मात्र,काही अन्न व्यावसायिकांनी मुदतीपूर्व परवान्याचे नूतनीकरण केले नाही,तर काहींनी नूतनीकरण करून घेतले आहे.अनेक परवानाधारक सक्रिय नसल्याचेही आढळून आले आहे.त्यामुळे,ज्यांच्याकडे अद्यापही परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र नाही,अश्यांनी परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून घ्यावेत व कायद्याच्या कचाट्यातून बाहेर पडावे.
- Advertisement -

