- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार स्वप्निल इजप्पवार यांनी गंभीर दखल घेत कार्यवाहीचा सपाटा सुरु केला.त्यानुसार,२२ ऑगस्ट रोजी केलेल्या कार्यवाहीत तब्बल ११ सट्टा-पट्टीधारक व्यवसायीकांना जेरबंद करून तब्बल १ लाख १७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या धडक कारवाईने परिसरातील अवैध सट्टा-पट्टीचा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज शहराच्या मुख्य बाजारवाडीत टिनांचे शेड उभारुन सट्टा व्यवसायीक सट्टा-पट्टीचा व्यवसाय करीत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरिक्षक स्वप्निल इजप्पवार यांनी पथकासह थेट व्यवसायीक स्थळी जाऊन कार्यवाही केली.तसेच पोलीस पथकाच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागात धडक कारवाई करण्यात आली.यात सट्टा व्यवसाय करणारा देसाईगंज येथील प्रदिप साहु,विसोरा येथील पुंडलिक वाघाडे,नैनपुर येथील बिसेन प्रधान,विर्शी येथील विदुश्वर मेश्राम,शिवराजपुर येथील गणेश झिलपे, राजकुमार पराते(देसाईगंज),सर्वजित चंदनगिरी(नविन लाडज),सचिन धाकडे (विसोरा)सुनिल कुथे(आमगांव) हिवराज नंदेश्वर पिंपळगाव ता.ब्रम्हपुरी व सोनु उर्फ अल्लाउद्दीन पठाण रा.देसाईगंज अश्या ११ सट्टा-पट्टी व्यवसायीकांना ताब्यात घेत त्यांचेवर देसाईगंज पोलीस ठाण्यात अप.क्र.४९९/२०२६ कलम १२ नुसार महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.करण्यात आलेल्या धडक कारवाईत नगद रोख रक्कम,मेस्ट्रो कंपनीची दुचाकी स्कुटी,सट्टापट्टी लिहिण्याचे छापिल बुक,पेन,कार्बन,लोखंडी स्टॅंड,कुलर पंखा पाणि पिण्याचे जार,असा एकूण तब्बल १ लाख १७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी साहित्यांसह सट्टेवाल्यांना उचलून नेल्याने परिसरात सट्टा-पट्टी घेणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
- Advertisement -

