Sunday, August 23, 2026
Homeकोंढाळाशेतावर गेला 'तो' घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. - कोंढाळा येथील...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गाव नजीकच्या शेतशिवारात आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.सुरेश डोमा सहारे वय ६२ वर्षे, रा.कोंढाळा,ता.देसाईगंज,जि.गडचिरोली असे शेतावर मृतावस्थेत आढळून आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
गेल्या दोन दिवसांपासून देसाईगंज तालुक्याच्या काही भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे,पिकांसाठी लागणाऱ्या पाण्याची अडवणूक करणे,तसेच शेतातील धान पिकांसाठी आवश्यक असणारी खते मारण्यासाठी परिसरातील शेतकरी बांधव शेतावर जातांना दिसून येतात.अश्याच प्रकारे कोंढाळा येथील शेतकरी सुरेश सहारे हे काल शनिवारच्या सकाळी ११ वाजताच्या सुमारास आपल्या शेतावर खत मारण्यासाठी गेले होते. मात्र,सायंकाळ होऊनही ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी परिसरात तसेच इतरत्र शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही सुरेश सहारे यांचा कुठेही थांगपत्ता लागलेला नव्हता. अश्यातच परत आज रविवारी सकाळच्या सुमारास कुटुंबीयांनी शेतशिवारात शोध घेतला असता सुरेश सहारे हे शेतातील बांधीत निपचित पडल्याचे दिसून आले.लागलीच कुटुंबीयांनी घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील किरण कुंभलवार यांना दिली. कुंभलवार यांनी तात्काळ शेत शिवारातील घटनास्थळ गाठून घटनेबाबत देसाईगंज पोलीस ठाण्याला कळवून पोलिसांना पाचारण केले. त्यानुसार,देसाईगंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष गोडबोले,पोलीस उपनिरीक्षक अनिल डेरकर,बिट अंमलदार करण हुर्रा यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून उपस्थित नागरिकांच्या सहाय्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पाठवला.शेतावर गेलेल्या शेतकऱ्याचा अचानकपणे दुर्दैवी मृत्यू झाल्याने
परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून प्रकरणाचा पुढील तपास देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक स्वप्निल इजप्पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त आज शनिवारी कुरखेडा तालुक्याच्या आंधळी गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात...

आता पोलीस दलातून निवृत्त होणारे श्वान राहणार पोलीस दलाचाच भाग..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने पोलीस  दलातून निवृत्त होणाऱ्या श्वानांसाठी अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे.यापुढे १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर श्वान पोलीस दलाच्या सेवेतून...

घरोघरी जाऊन रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात.. -दोघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-घरोघरी जाऊन नागरिकांकडून रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्या दोघांना पोलिस व पुरवठा शाखेच्या संयुक्त पथकाने दोघांना ताब्यात घेत अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!