Monday, August 24, 2026
Homeकोंढाळा"वाघाने खाल्लन-वाघाने खाल्लन"; कोंढाळा येथे वाघाच्या अफवेने खळबळ..

“वाघाने खाल्लन-वाघाने खाल्लन”; कोंढाळा येथे वाघाच्या अफवेने खळबळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-सध्या वाघ आणि इतर हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात अनेकजण जीव गमावत आहेत. अश्यातच “वाघाने खाल्लन-वाघाने खाल्लन” अशी बोंब आज सोमवारच्या सकाळी दहा वाजेच्या सुमारास देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावात वाऱ्यासारखी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली.लागलीच वन विभागाचे कर्मचारी,पोलीस पाटील व ग्रामस्थांनी गावालगतच्या जंगल परिसरातील घटनास्थळाकडे धाव घेऊन पाहणी करतात तो काय? सर्वजण अफवांचा बाजार म्हणून गेल्या पावली गावाकडे परतायला लागले.
सध्या ग्रामीण भागात तेंदूपाने तोडण्याचा हंगाम सुरू आहे.त्यामुळे,ग्रामीण भागातील अनेक कुटुंब सकाळच्या सुमारास तेंदूपाने तोडण्यासाठी जंगल परिसरात जात आहेत.अश्याच प्रकारे देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील पुरुषांसह महिला वर्ग आज सकाळच्या सुमारास गावालगतच्या जंगल परिसरात तेंदूपाने तोडण्यासाठी गेले होते.सकाळपासून तेंदूपाने तोडण्यात व्यस्त असतांनाच गावातील एकाने खुद्द आपल्याच पत्नीला वाघाने खाल्लन म्हणून गावात बोंब मारली.सदरची बोंब गावात वाऱ्यासारखी पसरताच संवेदनशील बाब म्हणून कुणी वनरक्षक यांना फोन घुमावला,तर कुणी पोलीस पाटील व इतरांना माहिती द्यायला लागले.त्यातच,तरुण मंडळीसह ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनाने घटनास्थळाकडे धाव घेतली.विशेष म्हणजे,कोंढाळा जंगल परिसर व आजूबाजूच्या परिसरात यापूर्वी वाघाच्या हल्ल्यात बऱ्याच नागरिकांनी जीव गमावला असल्याने बोंब खरी आहे की काय? पाहण्यासाठी जंगल परिसराकडे निघाले.परिसरात पाहतात तर काय?तेंदूपाने तोडण्यासाठी जंगल परिसरात गेलेले पुरुष व महिला वर्ग घराकडे परतीच्या वाटेवर होते.ग्रामस्थांनी घटनेबाबत विचारणा केल्यावर ‘काहीपण उगीच अफवा पसरवता’ असे म्हणून सगळ्यांना गावाकडे परतायला लावले.
कोंढाळा व उसेगावच्या जंगल परिसरात एक वाघ,एक वाघीण व इतर हिंस्त्र प्राणी असल्याची माहिती आहे. हिंस्त्र प्राणी एकाच ठिकाणी न राहता परिसरात घुमजाव करत असतात.त्यामुळे,जंगल परिसरात जातांना नागरिकांनी सतर्कता बाळगावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!