Friday, October 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तयंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस; शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करण्याचा सल्ला..

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस; शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करण्याचा सल्ला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-यंदाच्या पावसाळ्याबाबत चिंता कायम आहे.हवामान विभागाने ‘अल निनो’ च्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच अनेक पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.जर पावसाळ्यातही अशीच अनिश्चित परिस्थिती राहिली,तर त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना आधीपासूनच योग्य नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे.कृषी विभागाने शेतकऱ्यांना एकाच पिकावर अवलंबून न राहण्याचा सल्ला दिला आहे.मिश्र पीक पद्धती,आंतरपीक आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पीक नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.अनेक भागातील कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरू केले आहे.कमी पावसाच्या परिस्थितीत उत्पादन टिकवण्यासाठी आधुनिक शेती पद्धतींचा वापर करण्यावरही भर दिला जात आहे.अश्यातच भारतीय हवामान विभागाने आज पुढील २४ तास विदर्भ आणि मराठवाड्यासाठी धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे.या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘दिशा अभियान’अंतर्गत विशेष शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे आणि समाजात त्यांचा वावर सहज व सन्मानपूर्वक व्हावा,यासाठी विशेष शिक्षकांनी संवेदनशीलतेने कार्य करावे.या विद्यार्थ्यांना...

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्यासाठी रिट याचिका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तब्बल ९८ हजार ७८२ मतदारांचे अर्ज प्रलंबित असतांना अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची घाई केली जात...

माता व बालकांचे पोषण सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ‘व्हील्स ग्लोबल फाउंडेशन’शी सामंजस्य करार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील माता,अर्भक आणि लहान बालकांचे पोषण सुधारण्यासाठी तसेच कुपोषण प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन आणि व्हील्स ग्लोबल फाउंडेशन इंडिया...

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!