Friday, October 9, 2026
Homeगडचिरोलीचालू कूलरला हात लावू नका; कूलरला हात लागताच तंटामुक्ती समिती अध्यक्षाचा मृत्यू..

चालू कूलरला हात लावू नका; कूलरला हात लागताच तंटामुक्ती समिती अध्यक्षाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकजण घरात कूलर लावून थंड हवा घेण्याचा प्रयत्न करतात.पण, तोच कूलर एखादेवेळी जीवघेणा ठरू शकतो.अशीच एक घटना गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यात उघडकीस आली आणि अख्ख्या गावात शोककळा पसरली.कूलरची हवा गरम येत असल्याने कूलरमधील खसवर(गवत)पाणी पडून थंड हवा यावी यासाठी कूलरवरील बुजलेली छिद्रे मोकळी करत असतांनाच चालू कूलरच्या लोखंडी बॉडीला हात लागला आणि जोरदार करंट लागून माजी तंटामुक्ती समिती अध्यक्षाचा मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी सकाळच्या सुमारास अहेरी तालुक्याच्या चिंचगुंडी गावात घडली.प्रभाकर तोगरवार वय ५५ वर्षे असे मृत पावलेल्या माजी तंटामुक्ती समिती अध्यक्षाचे नाव असून त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले आणि दोन मुली असा आप्तपरिवार आहे. घटनेने तोगरवार कुटूंबीय शोकसागरात बुडाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
  • नागरिकांना आवाहन👇
कूलरचा वापर करणाऱ्या नागरिकांनी कूलर चालू म्हणजेच सुरू असतांना कूलरमध्ये पाणी भरणे वा इतर क्रिया करू नये.विशेषतः कूलरची बोर्डवरील पिन काढूनच कूलरमध्ये पाणी भरणे तसेच कूलरवरील बुजलेली छिद्रे मोकळी करावीत.कूलरचा करंट लागत नाही म्हणून अनेकजण चालू कूलरमध्ये पाणी भरत असतात.पण,एखादेवेळी अचानकपणे दुर्घटना घडत असते.त्यामुळे सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘दिशा अभियान’अंतर्गत विशेष शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे आणि समाजात त्यांचा वावर सहज व सन्मानपूर्वक व्हावा,यासाठी विशेष शिक्षकांनी संवेदनशीलतेने कार्य करावे.या विद्यार्थ्यांना...

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्यासाठी रिट याचिका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तब्बल ९८ हजार ७८२ मतदारांचे अर्ज प्रलंबित असतांना अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची घाई केली जात...

माता व बालकांचे पोषण सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ‘व्हील्स ग्लोबल फाउंडेशन’शी सामंजस्य करार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील माता,अर्भक आणि लहान बालकांचे पोषण सुधारण्यासाठी तसेच कुपोषण प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन आणि व्हील्स ग्लोबल फाउंडेशन इंडिया...

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!