Wednesday, October 7, 2026
Homeगडचिरोलीउद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमांसाठी श्रीकृष्णा शालीकराम धोटे(प्रबोधनकार), श्री संत गाडगेबाबा विचार प्रबोधन बहुउद्देशीय संस्था, गाडगेनगर,अमरावती हे मार्गदर्शन करणार आहेत.
  • कार्यक्रमाचे वेळापत्रक👇
  • उद्या,मंगळवार ७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता– पीएमश्री जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा,रामनगर,गडचिरोली.
  • बुधवार ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता–नगर परिषद सभागृह,आरमोरी.
  • गुरुवार ९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता–नगर परिषद सभागृह,देसाईगंज.
या प्रबोधन कार्यक्रमांमध्ये जादूटोणा व अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याबाबत माहिती,अंधश्रद्धेचे दुष्परिणाम,वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज,समाजात विवेकवादी विचारांचा प्रसार तसेच नागरिकांची कायदेशीर जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी या प्रबोधन कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक जनजागृतीच्या उपक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव...

आता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!