Tuesday, October 6, 2026
Homeगडचिरोलीराज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाचा सर्पदंशाने मृत्यू..

राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाचा सर्पदंशाने मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ)जवानाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज,मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत घडली.राहुल प्रभाकर शिंगाडे वय ३५ वर्षे असे सर्पदंशाने मृत पावलेल्या जवानाचे नाव असून ते मूळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी होते.
राहुल शिंगाडे हे आज मंगळवारच्या सकाळी ११.३०  च्या सुमारास स्नानगृहात आंघोळीसाठी जात असतांनाच त्यांना एका सापाने दंश केला.सर्पदंशाची घटना लक्षात येताच त्यांना तात्काळ चामोर्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे प्राथमिक उपचार करून दुपारच्या सुमारास पुढील उपचारार्थ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र,तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. दरम्यान,पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून घटनेची नोंद केली.घटनेने राज्य राखीव पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोरची तालुक्यातील सीताफळ-जांभूळ उत्पादनाला चालना देण्यासाठी रोपवाटिका,प्रक्रिया केंद्र व शीतगृह उभारावे.. -आमदार रामदास मसरामांची कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा मतदारसंघातील कोरची तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या सीताफळ व जांभूळ या फळपिकांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी तालुक्यात अद्ययावत रोपवाटिका,शेतकरी...

मंत्रिमंडळ निर्णय; आता पोलिसांच्या साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ योजना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावतांना जोखीम पत्करून केलेल्या साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ देण्याच्या योजनेस आज,मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी...

व्हॉट्सॲपवर आलेली अनोळखी लिंक उघडणे तरुणाला पडले महागात; लिंक उघडताच मोबाइल हॅक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाला व्हॉट्सॲपवर आलेली अनोळखी लिंक उघडणे चांगलेच महागात पडले आहे.लिंक उघडताच मोबाइल हॅक झाला आणि सायबर चोरट्यांनी मोबाईल...

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी विशेष नैमित्तिक रजा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी येत्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!