Tuesday, October 6, 2026
Homeगडचिरोलीमतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी विशेष नैमित्तिक रजा..

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी विशेष नैमित्तिक रजा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी येत्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे.या निवडणुकीत मतदार म्हणून नोंदणी असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजेची तरतूद आहे. खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या नोंदणीकृत मतदारांना मतदानासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर २०२६ रोजीच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.मतदानानंतर मंगळवार २७ ऑक्टोंबर २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या २३ जून २०११ रोजीच्या शासन निर्णयानुसार,पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष नैमित्तिक रजेची तरतूद करण्यात आली आहे.ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल.संबंधित शासन निर्णय मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना ही विशेष नैमित्तिक रजा लागू होत नाही.त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा,यासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर आयुक्त(सामान्य प्रशासन), नागपूर विभाग यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

व्हॉट्सॲपवर आलेली अनोळखी लिंक उघडणे तरुणाला पडले महागात; लिंक उघडताच मोबाइल हॅक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाला व्हॉट्सॲपवर आलेली अनोळखी लिंक उघडणे चांगलेच महागात पडले आहे.लिंक उघडताच मोबाइल हॅक झाला आणि सायबर चोरट्यांनी मोबाईल...

गडचिरोली जिल्ह्यातील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याची सन २०२६-२७ या वर्षातील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.चालू वर्षातील हंगामी पैसेवारी ही ६७ पैसे जाहीर करण्यात...

वाघाचा हल्ला महिलेचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शेतातील कामे आटोपून तलावालगतच्या शेतात खताच्या पिशव्या धूत असतांना जंगल परिसरातून मार्गक्रमण करत आलेल्या वाघाने अचानकपणे शेतकरी महिलेवर हल्ला चढवला.यात शेतकरी...

नैनपूर तलावावर विद्यार्थ्यांनी घेतला पक्षी निरीक्षणाचा अनोखा अनुभव.. -वन्यजीव सप्ताहाच्या सहाव्या दिवशी देसाईगंज वनविभागाचा स्तुत्य उपक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज :-पुस्तकातील निसर्ग शिकण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन त्याला प्रत्यक्ष अनुभवणे अधिक प्रभावी असते,याचा सुंदर प्रत्यय वन्यजीव सप्ताह २०२६ अंतर्गत सहाव्या दिवशी नैनपूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!