Thursday, September 24, 2026
Homeकोंढाळाभीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील लहरी कारखान्याजवळ घडली.गुरुदेव दिनाजी वसाके वय ३८ वर्षे,रा.कोंढाळा, ता.देसाईगंज,जि.गडचिरोली असे अपघातात मृत पावलेल्या तरुण कंत्राटदाराचे नाव आहे.
कोंढाळा येथील गुरुदेव वसाके हे देसाईगंज शहर व परिसरात घर बांधकामाची कंत्राटे घ्यायचे.हल्ली देसाईगंज शहराच्या गांधी वार्डात काम सुरू असल्याने आज रविवारी ते बांधकामस्थळी गेले होते.रविवारला देसाईगंज येथील बाजार असल्याने हप्ता भराची कामावरील मजुरांची मजुरी अदा करून दुपारच्या सुमारास एकटेच दुचाकीने देसाईगंजवरून गावाकडे निघाले होते.तब्बल सात किलोमीटर अंतर पार केल्यानंतर गावापासून अवघ्या एक किलोमिटर अंतरावर असलेल्या लहरी कारखान्याजवळ देसाईगंज -आरमोरी मुख्य मार्गावर देसाईगंजकडे जाणारी रुग्णवाहिका (अँब्युलन्स)आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक बसली.धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा समोरील भाग चक्काचूर झाला.अश्यातच दुचाकीवरील गुरुदेव वसाके हे दूरवर फेकले जाऊन मुख्य मार्गावर कोसळल्याने नाक व तोंडावाटे रक्तस्त्राव होऊन शरीरावर गंभीर जखमा झाल्या. अपघात घडताच मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. दरम्यान,ओळख पटल्याने कुटुंबीयांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गुरुदेव यांना देसाईगंज येथील रुग्णालयात नेत असतांनाच वाटेतच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पाठवला.रुग्णवाहिका पोलीस ठाण्यात जमा करून घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
गुरुदेव वसाके यांच्या पश्चात चार वर्षाचा चिमुकला, पत्नी,आई,वडील व दोन मोठे भाऊ असा आप्त परिवार आहे.अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेने वसाके कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!