Friday, June 19, 2026
Homeनागपूरताडोबात आढळले ४२ वाघ आणि १३ बिबटे; तब्बल ५ हजार ७६५...

ताडोबात आढळले ४२ वाघ आणि १३ बिबटे; तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक ‘मचान गणना’ उपक्रमात तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद करण्यात आली असून गणनेत ४२ वाघ आणि १३ बिबट्यांचे दर्शन झाले.त्याचबरोबर, या गणनेत विविध प्रजातींचे मोठ्या प्रमाणावर दर्शन झाले असून एकूण दर्शनांपैकी शाकाहारी प्राणी ३,०८९ (५३.६%),सर्वभक्षी १,५००(२६%),पक्षी ५७३ (९.९%), महाकाय मांसाहारी २०९(३.६%) आणि लहान मांसाहारी २१२(३.७%) होते.वाघांमध्ये कोअर क्षेत्रात १९ आणि बफर क्षेत्रात २३ वाघांची नोंद झाली,तर बिबट्यांमध्ये कोअर क्षेत्रात ५ आणि बफर क्षेत्रात ८ बिबट्यांचे दर्शन झाले.चितळांचे १,७०० हून अधिक,सांबरांचे ६०० हून अधिक आणि गव्यांचे ५०० हून अधिक दर्शन झाले. याशिवाय नीलगाय,भेकर,रानडुक्कर,मगर,अस्वल आणि विविध पक्ष्यांचीही नोंद झाली.कडक उन्हाळ्यात पाणवठ्यांवर एकत्र येणाऱ्या वन्यजीवांचे निरीक्षण करून त्यांच्या संख्येचे मूल्यांकन करण्यासाठी ही गणना केली जाते.या उपक्रमात वन विभागासोबत नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.कोअर क्षेत्रात ९९ मचाने आणि २०१ वन कर्मचाऱ्यांनी भाग घेतला,तर बफर क्षेत्रात ६९ मचाने होती,त्यापैकी ५४ ऑनलाइन आरक्षित होती आणि २१० वन्यजीव प्रेमींनी सहभाग घेतला.
  •   प्रभुनाथ शुक्ला,क्षेत्र संचालक👇
प्राणी गणनेतून मिळालेला डेटा वन्यजीव संवर्धन आणि अधिवास व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. ताडोबातील ही मचान जनगणना म्हणजे निसर्गाच्या समृद्धतेचा जिवंत पुरावा असून वाघ आणि बिबट्यांच्या उपस्थितीने अभयारण्याची ओळख अधिक बळकट झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

बळीराजासमोर यंदा महागाईचे नवे आव्हान; खत, बियाणे महागले..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांची जिकडून-तिकडून पिळवणूक सुरू आहे.पावसाळ्याचे महिने सुरू होऊनही कित्येक दिवसांपासून पाऊस पडण्याचे नावाच घेत नाहीये.अश्यातच आभाळाकडे आशेने नजरा लावून बसलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!