Tuesday, June 9, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथील इसमाने विष प्राशन करून केली आत्महत्त्या......- देसाईगंज तालुक्यातील आजची घटना....

कोंढाळा येथील इसमाने विष प्राशन करून केली आत्महत्त्या……- देसाईगंज तालुक्यातील आजची घटना….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

कोंढाळा :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील एका इसमाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज २६ मे २०२३ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.सदर इसमाचे नाव दिलीप रामचंद्र झिलपे,वय ५५ वर्षे असून कोंढाळा पासून काही अंतरावर पटाच्या दानिकडे असलेल्या नहराच्या कडेला मृतावस्थेत आढळून आला.सविस्तर वृत्त असे की, आज दुपारी २.३० वाजेच्या सुमारास गावातील महिला वर्ग व इतर नागरिक पटाच्या दानिवरून काम करून परत येत असतांना नहराच्या कडेला एक इसम झोपलेल्या अवस्थेत आढळून आला.सदर इसमाच्या जवळ दुपारच्या सुमारास कामावरून परत येत असणाऱ्या महिला वर्ग व इतर नागरिक गेले असता जवळच विषाची बॉटल व इसम झोपलेल्या अवस्थेत आढळून आल्याने घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील किरणताई कुंभलवार यांना देताच; लगेच त्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता; कोंढाळा येथील रहिवासी असलेले दिलीप झिलपे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे दिसून आले.त्यामुळे सदर घटना ही वाऱ्यासारखी पसरताच गावातील नागरिक व बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी निर्माण झाली होती.गावातील पोलीस पाटील यांनी सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलीस ठाण्यास कळवताच कोंढाळा बिटचे जमादार(पोलीस अंमलदार) मदन मडावी व गणेश बहेटवार यांनी घटनास्थळ गाठून सदर घटनेचा पंचनामा केला व शविच्छेदनासाठी सदर इसमाचे प्रेत देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.पुढील तपास देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार किरण रासकर यांच्या मार्ग दर्शनाखाली करीत आहेत.सदर इसमाने विष प्राशन करून आत्महत्या कशामुळे केली?अजूनपर्यंत कळलेले नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!