Saturday, May 30, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर यशस्वीरित्या...

देसाईगंज येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर यशस्वीरित्या संपन्न…- “जीवनात अशक्य असे काहीही नाही; आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य विकसित करून स्वयंरोजगाराची कास धरावी” -आमदार कृष्णा गजबे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर युवकांनी निराश न होता सातत्याने प्रयत्न केले पाहिजे.जीवनात अशक्य असे काहीही नाही.आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य विकसित करून स्वयंरोजगाराची कास धरावी; असे अमूल्य प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.कौशल्य रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभागाअंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंजच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन संस्थेच्या कार्यशाळेत करण्यात आले होते. सदर मेळाव्याचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. 

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणून तहसिलदार करिश्मा चौधरी,देसाईगंज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण रासकर,देसाईगंज नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा शालूताई दंडवते,सुभाष इंजीनीयरिंगचे संचालक मुरलीधर सुंदरकर उपस्थित होते.तसेच विशेष अतिथि म्हणून राजू एम.मुंडे प्रबंधक भारतीय स्टेट बँक वडसा,तालुका कृषि अधिकारी  नीलेश गेडाम,प्रा.दिलीप कहुरके,किशोर मेश्राम,संजय कुथे,प्रभाकर गोबाडे,लक्ष्मण रामाणी व इतर मान्यवर उपस्थित होते.

देसाईगंज तालुक्याचे तहसिलदार करिश्मा चौधरी यांनी उपस्थित उमेदवारांशी संवाद साधून स्पर्धा परीक्षा बद्दल अमूल्य मार्गदर्शन केले.वडसा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी गडचिरोली व महाराष्ट्र पोलिस भरती तसेच अग्निवीर योजनेबद्दल विस्तृत माहिती दिली.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे समुपदेशक प्रभाकर साखरे आणि पुनीत मातकर यांनी १० वी व १२ वी नंतर शिक्षणाच्या संधी व व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले.अनुराग बोरकर यांनी स्वयंरोजगार व शिक्षणाकरिता कर्जाच्या विविध योजने विषयी माहिती दिली.जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अतुल पवार यांनी व्यवसाय उभारून उद्योजक होण्याचे ध्येय बाळगण्याचे आवाहन केले.सदर कार्यक्रमाला देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा व कोरची तालुक्यातील सातशे (७००)युवक व युवतीं सहभागी झाले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे प्राचार्य सुरेश एस.चौधरी यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे संचालन  सतीश मेश्राम व आभार प्रदर्शन विष्णु नागमोती यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता संस्थेचे गट निर्देशक रविकान्त गोतमारे, डी.व्ही.सुर,रविंद्र लोही,माया जाधव,गुणवंत वांढरे,दीपक बोकडे,राकेश भोयर,टी.यू.सोयम,कु.लता लाडे,संदीप पिलारे,हेमंत मरकोल्हे,गजानन ठाकरे,सुरक्षा रक्षक व संस्थेतील इतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात व राष्ट्रागीताने समापन करण्यात आले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

रखरखत्या उन्हात शेतातच टाकली खाट अन् उपोषणास केली सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आज,शनिवार ३० मे पासून सकाळी दहा वाजे जालना...

लाखांदूर-देसाईगंज मार्गावर पेटत्या कारचा थरार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर-देसाईगंज मार्गावरील दुर्गा माता मंदिर पहाडीजवळ भर उन्हात पेटत्या कारचा थरार काल शुक्रवारी घडला.लाखांदूरहून निघालेली कार सोनी-चप्राळ पहाडीजवळ येताच धावत्या...

आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील वणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, शुक्रवार २९ मे रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!