Thursday, September 10, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथील तरुणाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू.. -आरमोरी-देसाईगंज मार्गावरील दुपारची घटना..

कोंढाळा येथील तरुणाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू.. -आरमोरी-देसाईगंज मार्गावरील दुपारची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील एका २९ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टरखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार १७ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास आरमोरी- देसाईगंज मार्गावर घडली.यात प्रशांत राजू बोरूले रा.कोंढाळा,ता.देसाईगंज,जि.गडचिरोली असे मृत ट्रॅक्टर चालक तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,कोंढाळा गावापासून दोन किलोमिटर अंतरावर आरमोरी मार्गे चुव्याची धोडीनाला नजिक एका ट्रकमध्ये बिघाड आल्याने प्रशांत बोरूले हा दुपारी १२ वाजेच्या दरम्यान विना ट्रॉली ट्रॅक्टर घेऊन गेला होता.ट्रक सुरू होत नसल्याने तसेच ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रक आणि ट्रॅक्टरला मोठे दोरखंड(टोचन)बांधून कोंढाळा गावाकडे घेऊन येत होते.अश्यातच धोडीनालावरील मुख्य मार्गावर खोलगट भाग असल्याने ट्रॅक्टरचा वेग वाढल्याने ट्रॅक्टर चालक प्रशांतने ट्रॅक्टरचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे ट्रकला बांधलेला दोरखंड ढील होऊन ट्रॅक्टरच्या चाकात येऊन ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला पलटी होत प्रशांत ट्रॅक्टरखाली दबल्या गेला.यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती गावात पसरताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत पोलीस पाटील किरण कुंभलवार यांना माहिती दिली.कुंभलवार यांनी देसाईगंज पोलीस ठाण्यास माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल होत ट्रॅक्टर खालील मृतदेह बाहेर काढून देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेनासाठी पाठवला. घटनेचा पुढील तपास देसाईगंज पोलीस प्रशासन करीत आहे.विशेष म्हणजे,मृत प्रशांतच्या वडिलांनी चार महिन्यांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केली होती.अश्यातच आता कमावत्या मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. प्रशांतच्या पश्चात चार वर्षाची मुलगी,पत्नी,मोठा भाऊ व आई असा परिवार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!