- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क होत नसलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे असलेल्या पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्यात येत आहे.गडचिरोली जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही,अशा पर्यटकांची माहिती जिल्हा प्रशासनाला तातडीने उपलब्ध करून द्यावी.
यासाठी जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष, गडचिरोली येथे दूरध्वनी क्रमांक-07132-222031 / 222035 तसेच मोबाईल क्रमांक 9423911077 / 8275370208 वर संपर्क साधता येईल.तसेच पोलीस नियंत्रण कक्ष,गडचिरोली येथे दूरध्वनी क्रमांक 07132-223142 वर संपर्क साधता येणार आहे.
अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देतांना संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव,मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेल,प्रवासाचा तपशील तसेच कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा.यामुळे संबंधित व्यक्तीबाबत आवश्यक माहिती संकलित करून पुढील समन्वय साधण्यास मदत होणार आहे.
- ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध👇
नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,मंत्रालय,मुंबई यांच्याकडे नोंदविण्यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.संबंधित पर्यटक अथवा त्यांच्या नातेवाईकांनी खालील लिंकवर माहिती नोंदवावी.
- ऑनलाइन नोंदणी लिंक👇
गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.आपत्तीग्रस्त भागातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक माहिती संकलित करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.
- Advertisement -

