Thursday, August 27, 2026
Homeजळगावधक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. -...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या केली.सुनील अमृत भिल,त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल आणि त्यांची दोन मुले इयत्ता दुसरीत शिकणारा सनी भिल व अंगणवाडीत जाणारा राज भिल अशी मृतकांची नावे असून आज पहाटे पावणे पाच वाजताच्या सुमारास रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसांना  माहिती दिल्याने सदरची घटना सर्वत्र उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे ठाणेदार दत्तात्रय निकम यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे,हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील,विजय भोई,योगेश बागुल,राहुल पाटील यांना पंचनाम्यासाठी पाठवले.चौघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.  सध्या पोलिस या सामूहिक आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत.आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.मात्र,प्राथमिक चर्चेत कौटुंबिक वाद वा इतर आर्थिक बाबींमुळे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.पोलिसांच्या सखोल तपासाअंतीच सर्व सत्य उघड होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रेनिंग संपली; आता महाराष्ट्राला मिळाले १२ नवे ‘आयपीएस’ अधिकारी.. – पहा कोणाला कुठे मिळाली पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-नुकतेच हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल १२ आयपीएस(भारतीय पोलीस सेवा) अधिकाऱ्यांना राज्यातील वेगवेगळ्या भागात जबाबदारी...

पैगंबरांच्या जिवनाचा आदर्श घ्या-इमाम फैजल अजहरी – कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ईद मिलादून्नबी(मोहम्मद पैगंबर जयंती)च्या पूर्वसंध्येला मौलाना आझाद चौक कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!