Thursday, August 6, 2026
Homeजळगावअन् 'त्याने' चक्क लगावली महिला कंडक्टरच्याच  कानशिलात…-तरुणावर गुन्हा दाखल…

अन् ‘त्याने’ चक्क लगावली महिला कंडक्टरच्याच  कानशिलात…-तरुणावर गुन्हा दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

जळगाव :- तालुक्यातील कंडारी गावात बसला थांबा नसल्याने नेरी गावापर्यंत तिकीट काढावे लागेल असे सांगितल्याच्या कारणावरून बसमधील महिला कंडाक्टरशी वाद घालून त्यांच्या कानशिलात लागवल्याची धक्कादायक घटना इच्छादेवी चौकात काल,शुक्रवारी दि.३ मे रोजी सायंकाळी घडली आहे.याप्रकरणी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की,जळगाव ते जामनेर या बसमध्ये करण कमलसिंग परदेशी वय २० रा.कंडारी ता.जळगाव हा तरूण जळगाव बसस्थानकातून बसमध्ये चढला.शुक्रवारी ३ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बस इच्छादेवी चौकातून जात असतांना महिला कंडाक्टर सुरेखा प्रविण पाटील वय-२५ रा.जामनेर यांनी कंडारी गावाला थांबा नसल्याचे करण परदेशी याला सांगितले.त्यामुळे नेरी पर्यंतचे तिकीट काढावे लागले; असे महिला कंडक्टर यांनी सांगितले.यामुळे करण परदेशी याने महिला कंडक्टर यांच्याशी वाद घालून दमदाटी केली.त्यानंतर त्यांच्या कानशिलात चापटाने मारहान करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर महिला कंडक्टर सुरेखा पाटील यांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली.त्यानुसार रात्री ८ वाजता मारहाण करणारा करण कमलसिंग परदेशी रा. कंडारी ता. जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे हे करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाचा हल्ला; पती ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातून एक धक्कादायक घटना आज,गुरुवार ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.दावेझरी गाव नजीकच्या चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी...

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!