Friday, June 19, 2026
Homeजळगावमाजी उपसरपंचाची शेत शिवारात दिवसाढवळ्या हत्या..

माजी उपसरपंचाची शेत शिवारात दिवसाढवळ्या हत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
जळगाव :-जळगाव तालुक्यातील कानसवाडा शिवारातील शेतात माजी उपसरपंच युवराज कोळी यांची हत्या करण्यात आली.या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून उर्वरित दोन जणांच्या मागावर पोलीस पथक रवाना झाले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉमहेश्वर रेड्डी यांनी दिली. युवराज सोपान कोळी वय-३५ वर्षे, रा.भादली ता.जळगाव असे मृत उपसरपंचाचे नाव असून ते आपल्या आई-वडील,पत्नी आणि तीन मुलांसह भादली गावात वास्तव्याला होते.३१ डिसेंबर रोजी युवराज कोळी यांचा भरत पाटील,देवा पाटील, हरीश पाटील या तिघांसोबत ढाब्यावर वाद झालेला होता.त्यानंतर याच कारणावरून काल,गुरुवारी २० मार्लाच रात्री १० वाजता युवराज कोळी आणि भरत पाटील यांच्यात पुन्हा वाद झाला.हा वाद रात्री नातेवाईकांच्या मदतीने मिटवण्यात आला होता. त्यानंतर आज, शुक्रवारी २१ मार्चला सकाळी ८ वाजेच्या सुमारास युवराज हे त्यांच्या आई-वडिलांसोबत कानसवाडा शिवारातील शेतात काम करत होते.त्यावेळी संशयित आरोपी भरत पाटील आणि त्याच्यासोबत असलेले देवा पाटील,हरिश पाटील यांनी येऊन धारदार चाकू आणि चॉपरने युवराज कोळी यांच्यावर वार केले.दरम्यान छातीवर केलेल्या गंभीर जखमी झाल्याने युवराज जागेवरच कोसळले.त्यांना् वाचवण्यासाठी त्यांचे वडील सोपान कोळी आणि आई यांनी देखील धाव घेतली.परंतु देवा आणि हरीश या दोघांनी दोघांना पकडून ठेवले होते. आई-वड़िलांच्या डोळ्यासमोर मुलाचा हा खून करण्यात आला होता.परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.तोपर्यंत भरत पाटील,देवा पाटील आणि हरीश पाटील हे मारेकरी पसार झाले होते. युवराज कोळींना खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.मुलाच्या मृत्यूची वार्ता ऐकताच आई आणि वडिलांनी टाहो फोडला. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगी यांनी देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!