Friday, June 19, 2026
Homeचंद्रपूरवाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर वय ५२ वर्षे, रा.गिरगाव,ता.नागभीड,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नेहमीप्रमाणे आत्माराम बोरकर यांनी काल,गुरुवार १८ जून रोजी गावालगतच्या जंगल परिसरात शेळ्या चराईसाठी नेल्या होत्या.दिवसभर शेळ्या चारून सायंकाळी शेळ्या घेऊन घरी परतले असता एक शेळी दिसून न आल्याने ते जंगल परिसरात गेले होते.रात्र होऊनही घरी परतले नसल्याने कुटूंबीयात चिंता पसरली. दरम्यान,आज जंगल परिसरात शोधमोहीम राबवली असता शोधादरम्यान त्यांचा मृतदेह जंगल परिसरात आढळून आला.घटनेची माहिती मिळताच एसीएफ महेश गायकवाड,आरएफओ ए.आर. कन्नमवार,आरओ हिंगणघर,पीआय राहुल गुहे पथकासह वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.वनविभागाने पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली.घटनेने परिसरात शोककळा पसरली असून जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!