- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी असा व्यक्ती आता काम करून दिले नं..मग चहापाणी; असे म्हटल्याशिवाय राहत नाही.असाच प्रकार एका तक्रारदार नागरिकाच्या बाबतीत घडल्याने त्यांनी चक्क वस्तु व सेवाकर विभागातील राज्यकर निरीक्षकास अद्दल घडवून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या स्वाधीन केले. जीएसटी नंबर मिळवून दिल्याच्या मोबदल्यात दहा हजाराची लाचेची मागणी प्रकरणी राज्यकर निरीक्षकास अप्पर पोलीस आयुक्त,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचे कार्यालय,९१ सर पोचखानवाला रोड,वरळी,मुंबई यांनी रंगेहाथ पकडले.संदिप रविराज खलाटे,राज्यकर निरीक्षक,वस्तु व सेवाकर विभाग,नोडल ७,माझगांव,मुंबई असे लाच घेतांना रंगेहाथ अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांनी जीएसटी नंबर मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता.सदरचा जीएसटी नंबर मिळवुन दिलेबाबत मोबदला म्हणून वस्तु व सेवाकर विभाग,नोडल ७,माझगांव,मुंबई येथील लोकसेवक संदिप रविराज खलाटे,राज्यकर निरीक्षक यांनी तक्रारदार यांचेकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केली.परंतू तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बुधवार १७ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,वरळी,मुंबई येथे समक्ष हजर राहून तक्रार दिली. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने १७ जून २०२६ रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान संदिप खलाटे यांनी तक्रारदार यांना जीएसटी नंबर मिळवुन दिलेबाबत १० हजार रुपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार, गुरुवार १८ जून २०२६ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक संदिप रविराज खलाटे यांना तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.प्रकरणी खलाटे विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.सदरची सापळा कारवाई प्रमोद सुर्वे,पोलीस निरीक्षक गंगाप्रसाद मुदिराज, सहाय्यक पोलीस आयुक्त,संदिप दिवाण,अप्पर पोलीस आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,मुंबई अनिल घेरडीकर,अप्पर पोलीस उप आयुक्त,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,मुंबई यांनी केली.
- Advertisement -

