Thursday, October 15, 2026
Homeकुरखेडापैगंबरांच्या जिवनाचा आदर्श घ्या-इमाम फैजल अजहरी - कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा..

पैगंबरांच्या जिवनाचा आदर्श घ्या-इमाम फैजल अजहरी – कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-ईद मिलादून्नबी(मोहम्मद पैगंबर जयंती)च्या पूर्वसंध्येला मौलाना आझाद चौक कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील इमाम फैजल अज़हरी यांनी आपल्या प्रबोधनात सांगितले की,पैगंबर मोहम्मद यांचे जिवन एक आदर्श आहे,या आदर्श जिवन पद्धतीचा अवलंब करून आपल्या जिवनाचे सार्थक करा,असे आवाहन त्यांनी उपस्थित समाज बांधवांना केले.
जामा मस्जिद कुरखेडा व जश्ने ईद मिलादून्नबी कमेटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जामा मस्जिद कुरखेडाचे अध्यक्ष हाजी मसूद शेख,उपाध्यक्ष शमीम शेख,मुतवल्ली हाजी मुजफ्फर शेख,आसिफ शेख,उसमान खान, शहेबाज शेख,बिलाल खाणानी, समीर पठाण,शहेबाज शेख,ईद मिलादून्नबी कमेटीचे अध्यक्ष न्याज सय्यद, उपाध्यक्ष तौकीर शेख,सचिव कासीद कुरेशी यांचेसह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रमात जामा मस्जिदचे इमाम दिलशाद,अहेमद व हाफीज आसिफ रजा यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी इमाम फैजल अज़हरी यांनी मार्गदर्शनात पूढे सांगीतले की, मिलादून्नबीचा आनंदोत्सव साजरा करतांना इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाही,याची काळजी घ्या.आपल्या वर्तणात संयम ठेवा,इतर समाजानेही प्रेरणा घ्यावी असा आदर्श आपल्या कृतीतून दाखवून द्या,असे आवाहन सूद्धा यावेळी त्यांनी केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

आमदार रामदास मसरामांनी आश्रमशाळा व मृतक विद्यार्थीनीच्या कूटूंबियांची घेतली भेट.. -पोलीस निरीक्षकांना आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील आठव्या वर्गाची विद्यार्थीनी राणू क्रिष्णा हलामी रा.मोहगांव हिने वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!