Saturday, October 10, 2026
Homeगडचिरोलीमतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६(Special Intensive Revision-SIR)कार्यक्रमात सुधारणा केली असून,सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार,येत्या ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येणार असून,४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाने १४ मे २०२६ रोजीच्या पत्रान्वये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला होता.त्यानंतर आयोगाच्या १९ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पत्रानुसार या कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना २४ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात येणार आहे.त्यानंतर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी केली जाणार आहे.प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना त्यातील नोंदी तपासता येणार असून,आवश्यकतेनुसार दावे व हरकती दाखल करता येतील.
  • दावे व हरकतींसाठी महिनाभराची मुदत👇
प्रारूप मतदार याद्यांवरील दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.या कालावधीत प्राप्त होणाऱ्या दावे व हरकतींवर निवडणूक यंत्रणेमार्फत नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
दावे व हरकतींच्या अनुषंगाने नोटीस देणे तसेच प्राप्त दावे व हरकती निकालात काढण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात येईल.सर्व दावे व हरकती निकाली काढल्यानंतर मतदार यादीला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.
  • ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी👇
विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येणार आहे.मतदारांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले नाव व इतर तपशील तपासून घ्यावेत तसेच आवश्यक असल्यास निर्धारित कालावधीत दावे किंवा हरकती दाखल कराव्यात.मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम उपजिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली राहुल जाधव यांनी कळविला आहे.
  • सुधारित कार्यक्रम एका दृष्टिक्षेपात👇
– मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण/पुनर्रचना–२४ ऑगस्ट २०२६
– प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी–३१ ऑगस्ट २०२६
– दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी–३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६
– नोटीस टप्पा तसेच दावे व हरकती निकाली काढणे –३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोंबर २०२६
– अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी– ४ नोव्हेंबर २०२६
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहूरगडच्या श्री रेणुका माता शक्तिपीठातून दिव्य ज्योत आणण्यासाठी चोपचे भक्त रवाना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नवरात्रोत्सवानिमित्त श्री रेणुका माता शक्तिपीठ,माहूरगड येथून पवित्र दिव्य ज्योत आणण्यासाठी देसाईगंज तालुक्यातील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ,चोपचे भक्त आज,शनिवार १० ऑक्टोंबरला रवाना झाले.गेल्या...

आगामी काळात अन्न धान्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा महाराष्ट्र राज्यात पड़लेल्या भीषण दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतातील उभी पिके उद्धवस्त झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात...

तब्बल १२ लाखांहून अधिक हिवताप चाचण्या; हिवतापाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि आरोग्य विभाग,जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या धडक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मोहिमांमुळे...

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!