- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच ‘मी आलोय’ म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार म्हणून पावसाची कावळ्यासारखी वाट पाहत राहावी लागते. त्यातच,आता हवामान विभागाच्या अंदाजावर अवलंबून राहण्याची वेळ आल्याने असेच चित्र राहिले तर पुढील काळात काही खरे नाही.अश्यातच पुढील दोन दिवस म्हणजेच उद्या,मंगळवार २८ जुलै व बुधवार २९ जुलै रोजी विदर्भातील सर्व जिल्हे पावसाचे असणार आहेत. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस,मेघगर्जना, विजांचा कडकडाट,तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.तर आज,सोमवार २७ जुलै रोजी यवतमाळ,वर्धा,नागपूर,भंडारा,गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सात जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.काही ठिकाणी पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडणार असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
- Advertisement -

