Sunday, September 6, 2026
Homeनागपूरनागपुरातील ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आजपासून सुरू..

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.यंदाचा मुख्य मारबत महोत्सव येत्या,शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारच्या सुमारास शहराच्या गांधी पुतळा परिसरात आयोजित करण्यात आला आहे.यावर्षीच्या महोत्सवात विविध देशांचे प्रतिनिधी,मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार,तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना बोलावण्यात आले आहे.राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते आज,रविवार ६ सप्टेंबर रोजी काळी आणि पिवळी मारबत यांची पूजा करून महोत्सवाचे उद्घाटन झाले.मंत्री आशिष शेलार म्हणाले की,मारबत परंपरा शहरातून वाईट गोष्टी आणि रोगराई दूर पळवण्याचे प्रतीक आहे.राज्य सरकार या परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.दरम्यान,सोशल मीडियावर मारबत पाहण्यासाठी तिकीट लागेल अशा चर्चा पसरल्या होत्या.यावर महानगर पालिका स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी स्पष्ट केले की,मारबत पाहण्यासाठी कोणतेही तिकीट ठेवण्यात आलेले नाही.महानगर पालिकेने फक्त इच्छुक नागरिकांसाठी टी-शर्ट आणि बँड उपलब्ध केले आहेत,जे खरेदी करणे ऐच्छिक आहे.नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन नागपूर महानगर पालिका प्रशासनाने केले आहे.यंदाचा उत्सव फक्त शहरातच नाही,तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने तयारी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!