Sunday, August 30, 2026
Homeनागपूरतब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या 'ई-मेल' ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास शाळा तसेच इतर ठिकाणच्या अधिकृत ‘ई-मेल’ आयडीवर दिसून येताच शहरात एकच खळबळ उडाली होती.विशेष म्हणजे,शाळेच्या मुख्याध्यापकांनी ई-मेल पाहताच तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.धमकीची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली.नागपूरचे सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना अलर्ट जारी केला व तपास यंत्रणा कामाला लागली.ई-मेलमध्ये,शाळा विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार लादत आहेत आणि याच कारणामुळे संपूर्ण शाळा बॉम्बने उडवून देण्यात येतील.त्याचबरोबर,ई-मेलमध्ये खलिस्तान समर्थकांचा उल्लेख करीत ३१ ऑगस्टला स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती.या पार्श्वभूमीवर खबरदारी आणि सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील काही शाळांनी उद्या,सोमवार ३१ ऑगस्टला सुटी जाहीर केली आहे.बेसा-घोगली येथील माउंट लिट्रा झी स्कूलसह धमकीचे ई-मेल प्राप्त झालेल्या अन्य काही शाळांनीही सुटी जाहीर केली आहे. महत्वाचे म्हणजे,१८ ऑगस्ट रोजी hxggzf7@gmail.com या अज्ञात आयडीवरून धमकीचा ई मेल करण्यात आला होता, ज्यामुळे शहरभर सुरक्षेची भीती निर्माण झाली होती. त्यात डझनहून अधिक शाळा,उच्च न्यायालय,महापौरांचे कार्यालय आणि नागपूर महानगरपालिका यांना लक्ष्य करण्यात आले होते.ईमेलमध्ये दुपारी १.११ वाजता शाळांमध्ये,त्यानंतर दुपारी २.११ वाजता उच्च न्यायालयात आणि दुपारी ३.११ वाजता महानगरपालिकेत स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती.तसेच ३१ ऑगस्ट रोजी स्फोटाचा इशारा देण्यात आला होता.त्यानुसार,पोलिसांनी धमकी आलेल्या सर्व खासगी आणि सरकारी शाळांची कसून तपासणी केली होती.सुदैवाने तपासणीत कोठेही बॉम्ब किंवा कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नव्हती.त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र,अद्यापही धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती काहींच्या मनात घर करीत आहे.अश्यातच ई-मेलद्वारे शाळा उडवून देण्याच्या धमकीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन सतर्क झाले आहे.ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे; अश्या सर्व ठिकाणांवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

भरधाव वेगात असलेल्या कारने एकाला चिरडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना आज,रविवार ३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहरातील जपानी गार्डन...

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!