- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना आज,रविवार ३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहरातील जपानी गार्डन मार्गावर घडली.कैलास सनोडिया वय ६० वर्षे,नागपूर असे या अपघातात प्राण गमावलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून ते ‘मॉर्निंग वॉक’ करत जात असतांनाच एका इनोव्हा कारने जोरदार धडक देऊन चिरडले.
आज सकाळच्या सुमारास तीन कार अत्यंत वेगाने जपानी गार्डन मार्गावरून धावत होत्या.विशेष म्हणजे, कार चालक एकमेकांशी शर्यत लावण्याचा संशय आहे. या शर्यतीदरम्यान एका भरधाव कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती थेट जपानी गार्डनच्या भिंतीवर जाऊन धडकली.याच वेळी रस्त्यावरून ‘मॉर्निंग वॉक’ करत जात असलेले कैलास सनोडिया यांना कारने जोरदार धडक देऊन चिरडले.यात त्यांचा काही वेळातच मृत्यू झाला.अपघातानंतर सोबत असलेल्या दोन कारचालकांनी घटनास्थळावरून पळ काढला.अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने दाखल झाले.धडक इतकी जोरदार होती की इनोव्हातील एक व्यक्ती आतमध्येच अडकून पडली होती.पोलिसांनी कारवाई करत इनोव्हामधील दोघांना ताब्यात घेतले असून,गाडीत फसलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.इतर दोन कारचा आणि चालकांचा पोलीस शोध घेत आहेत.
- Advertisement -

