उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या किरकोळ बाजारात कांद्याचे दर वेगाने वाढून थेट ६० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.काही दिवसांपूर्वी अगदी सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध असणारा कांदा अचानक महाग झाल्याने सर्वसामान्य व मध्यमवर्गीय गृहिणींचे महिन्याचे घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.स्थानिक बाजारात सध्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.विशेष म्हणजे, भाजी,पोहे,उपमा,उसळ,मिसळ,चटणी यांसारख्या विविध खाद्यपदार्थांमध्ये कांद्याशिवाय स्वयंपाकाची चवच पूर्ण होत नाही.अश्यातच ६० रुपयांपर्यंत पोहोचलेल्या कांद्याच्या दराचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे.कांद्याच्या या भडकलेल्या किंमतींमुळे ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींवरही मोठा परिणाम झाला आहे.पूर्वी जे ग्राहक बाजारातून एकत्रच दोन ते तीन किलो कांदा खरेदी करत होते; ते आता महागाईमुळे केवळ गरजेपुरताच कांदा खरेदी करतांना दिसत आहेत.मागणी आणि पुरवठ्यातील या विसंगतीमुळे कांद्याचे दर वधारले आहेत.मात्र,वाढलेल्या दराचा फायदा रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या शेतकरी बांधवांना खरोखरच होत असेल काय? याचा विचार करणे गरजेचे आहे.त्यातच,बाजारात नवीन मालाची आवक जोपर्यंत होत नाही; तोपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याची दाट शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

