- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील
महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक(API)यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती.त्यानंतर,२९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास हिंगोली जिल्हा पोलिस दलातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक(PSI)यांनी धावत्या रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या केली.या दोन्ही घटना ताज्या असतांनाच आता नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.नवी मुंबई पोलीस दलाच्या विशेष शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI)पांडुरंग निंबा पाटील वय ५६ वर्षे यांनी रबाळे एमआयडीसी परिसरातील महापे येथील साची लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
पाटील हे गेल्या दोन दिवसांपासून घरी गेले नसल्याने कुटुंबीय चिंतेत होते.अश्यातच कुटुंबीयांनी काल शनिवारी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेत पाटील बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी गेले.त्यानंतर पोलिसांनी पाटील यांचा शोध सुरू केला.शोध घेत असतांनाच महापे येथील साची लॉजमध्ये पाटील यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे समोर आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत प्रकरणाचा तपास सुरू केला.दरम्यान,पोलिसांना कथित सुसाईड नोट सापडली.यात काही पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हिडिओ तयार केला.तयार केलेल्या व्हिडीओमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे न्यायाची मागणी केल्याचे समोर आले आहे.त्यांनी एका माजी पोलीस उपायुक्त(DCP), वायरलेस एसीपी(ACP)आणि हेड क्लार्क/कॉन्स्टेबल यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचे म्हटले आहे व माझ्या मृत्यूस कारणीभूत,असे लिहून “मी पान १ ते ८ पानांची सविस्तर सुसाईड नोट व चिठ्ठी लिहिली आहे”; असे एका कागदावर लिहिले आहे.या सुसाईड नोटमध्ये नेमके काय आरोप करण्यात आले आहेत.याबाबत अधिकृत स्पष्टता तपासानंतरच होणार आहे.

- Advertisement -

