Friday, June 12, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-येत्या गुरुवार १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन सर्वत्र मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार आहे.त्यामुळे विविध राजकीय पक्ष,संघटना आणि नागरिकांकडून धरणे,मोर्चे,आंदोलने,सभा किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता लक्षात घेता,जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण जिल्ह्यात २६ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्रीपासून ते १० मे २०२५ च्या रात्री १२ वाजे पर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे.या कालावधीत शस्त्रास्त्र,दाहक व स्फोटक पदार्थ,दगड, क्षेपणास्त्रांची उपकरणे यांचा वापर किंवा वाहतूक, तसेच सभ्यता व नितीमत्तेला धक्का पोहचवणारी भाषणे,गाणी,चित्रफलक किंवा जनतेत अस्थिरता निर्माण करणारी कोणतीही कृती करण्यास बंदी घालण्यात आली आहे.याशिवाय उपविभागीय दंडाधिकारी किंवा संबंधित पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतीही मिरवणूक काढणे तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे पूर्णतः मनाई करण्यात आले आहे.सदरचा आदेश संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात लागू असून उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल,असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

हायवा ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका अनियंत्रित हायवा ट्रकचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवार ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!