- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरण २०१२ अंतर्गत व राज्य युवा धोरण २०१२ अन्वये जिल्ह्यातील युवक व युवतींच्या समाजहिताच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी जिल्हास्तरावर “जिल्हा युवा पुरस्कार” प्रदान करण्यात येतो.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,गडचिरोली यांच्यातर्फे सन २०२३-२४ या वर्षासाठी पुरस्कारार्थींची घोषणा करण्यात आली आहे.त्यानुसार युवक विभागात राहुल संजय वैरागडे रा.भेंडाळा, ता.चामोर्शी तर युवती विभागात कु.सपना सुधाकर लाडे रा.कोरेगाव,ता.देसाईगंज यांची निवड करण्यात आली आहे.दोन्ही पुरस्कारार्थींना प्रत्येकी १० हजार रुपये,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.सदरचा पुरस्कार गुरुवार १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाच्या समारंभात पोलीस मुख्यालय परेड मैदान गडचिरोली येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
राहुल वैरागडे यांनी केलेली कार्य👇
पाणपोई उभारणे,सामान्य ज्ञान स्पर्धांचे आयोजन,गुणवंत विद्यार्थी सत्कार, वनराई बंधारा बांधणे,पक्षी संवर्धन, वृक्षारोपण,वनसंवर्धन, कोरोनावरील जनजागृती पथनाट्य सादरीकरण,क्रीडा स्पर्धा आयोजन,मतदार जनजागृती,रक्तदान शिबीर,पूरग्रस्त मदतकार्य,स्वच्छता मोहीम व अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध सामाजिक उपक्रमांत सक्रीय सहभाग घेतला आहे.
कु.सपना लाडे यांनी केलेली कार्य👇
आरोग्य शिबिरे, “केच द रेन” अभियान,स्वयंसेवक नोंदणी,अॅनिमिया तपासणी कॅम्प, “माझी माती माझा देश”, “हर घर तिरंगा”, जल जीवन मिशन,पक्षी संवर्धन,वृक्षारोपण, कोविड-१९ लस शिबिरे,तालुका क्रीडा स्पर्धा,मतदार जनजागृती,व्यसनमुक्ती,स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलन,पोषक आहार प्रचार असे विविध उपक्रम राबवले आहेत.
या दोन्ही युवक-युवतींच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना सन २०२३-२४ चा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी दिली आहे.
- Advertisement -

