Thursday, September 24, 2026
Homeभंडारापळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या भंडारा पथकास यश आले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस येथून अपहृत मुलगी व संशयित आरोपी दोघांनाही सुखरूप ताब्यात घेण्यात आले.तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र.२६६/२०२५, कलम १३७(२)भारतीय न्याय संहिता अन्वये अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता.दरम्यान,दोन दिवसांपूर्वी ७ ऑगस्टला भंडारा पथकातील महिला पोलिस हवालदार कुथे, पोलिस अंमलदार घरडे व पोलिस अंमलदार किरसान यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक तपासाच्या आधारे दाखल गुन्ह्यातील अपहृत मुलगी आणि संशयित आरोपी राहुल बोरघरे रा.सुकळी यांचा शोध घेतला.तपासादरम्यान दोघेही घुग्घूस,जि.चंद्रपूर येथे असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर,पथकाने तात्काळ तेथे पोहोचून दोघांनाही सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीला आवश्यक कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले असून,मुलगी व संशयित आरोपीला गुन्ह्याच्या मूळ कागदपत्रांसह पुढील कायदेशीर कारवाईसाठी तुमसर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन,अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र लांडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.महिला पोलीस हवालदार अर्चना कुथे,मंजुषा घरडे व पोलीस अंमलदार मानिक किरसान यांनी शोधमोहीमेत महत्त्वाची भूमिका बजावली असून अल्पवयीन मुलीचा शोध लागल्याने कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कृषी विभागातील तब्बल १४ हजार ४४५ तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांना एक दिवसांचे वेतन..

उद्रेक न्युज वृत्त :-निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकरी बांधवांना फटका सहन करावा लागतो आहे. कधी अवकाळी पाऊस,तर कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी ऐन हंगामात धो-धो पावसामुळे...

सायबर फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल व्यवहारात सतर्कता आवश्यक- इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचे राज्य समन्वयक संजय त्रिपाठी – अनोळखी लिंक,संदेश अथवा आमिषांना प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांची खातरजमा...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असतांना सायबर गुन्ह्यांच्या पद्धतीही बदलत आहेत.ऑनलाइन आर्थिक फसवणूक आणि वैयक्तिक माहितीच्या गैरवापरापासून स्वतःचे संरक्षण...

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!