Sunday, July 19, 2026
Homeमुंबईघरातील फ्रिजचा अचानक स्फोट; वडील व दोन मुलांचा होरपळून मृत्यू..

घरातील फ्रिजचा अचानक स्फोट; वडील व दोन मुलांचा होरपळून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-मध्यरात्रीच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घातल्याची घटना आज, शनिवार १० जानेवारीच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.मध्यरात्री घरातील फ्रिजचा अचानकपणे स्फोट झाल्याने वडील व दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला.सदरची घटना मुंबईच्या
गोरगाव(पश्चिम)येथील भगतसिंह नगर,राजाराम लेन, जनता स्टोअर्सजवळील झोपडपट्टीतील एका घरात घडली.घटनेत संजोग पावस्कर वय ४८ वर्षे,१९ वर्षीय मुलगी हर्षदा पावस्कर व १२ वर्षीय मुलगा कुशल पावस्कर या तिघांचा होरपळून मृत्यू झाला.तर घटनेतील सुदैवाची बाब म्हणजे,मुलांची आई घराबाहेर रात्रपाळीच्या कामावर गेलेली असल्याने ती बचावली.  मात्र,एका रात्रीत आपले संपूर्ण कुटुंब गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास पावस्कर कुटूंबीय गाढ झोपेत असतांना अचानक घरातील फ्रिजचा मोठा स्फोट झाला आणि काही क्षणांतच घराला आगीने वेढा घातला.घराला प्लास्टिक शीट लावलेली असल्याने आगीचा भडका अधिकच उडाला.आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी मुलांनी धडपड केली.१२ वर्षांचा कुशल आग टाळण्यासाठी घरातील बाथरूममध्ये जाऊन लपला होता.मात्र,प्लास्टिक शीटमुळे आग वेगाने पसरली आणि धुराचे लोट वाढल्याने मुलांचा गुदमरून आणि होरपळून मृत्यू झाला.स्थानिक नागरिकांना मध्यरात्री घरातून मुलांच्या किंचाळण्याचे आवाज ऐकू येताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून आत अडकलेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला,मात्र तो निष्फळ ठरला.अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी बादल्यांमधून पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला.पण,आगीचा भडका उडाल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ ते ५ गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांनाही बाहेर काढून पोलीस व्हॅन व खासगी वाहनांच्या मदतीने ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले.मात्र,तोपर्यंत पावस्कर कुटुंबातील तिन्ही सदस्यांचा मृत्यू झाला होता. अचानक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध गावात दहशत माजवणारी वाघीण जेरबंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील विविध गावात दहशत माजवणाऱ्या वाघिणीला पकडण्यात वनविभागास यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.विशेष म्हणजे,वाघिणीने समुद्रपूर तालुक्याच्या पिंपळगाव,उंदीरगाव,साखरा,...

अखेर उद्या होणारा डॉक्टरांचा राज्यव्यापी संप मागे; आरोग्य सेवा राहणार सुरळीत..

उद्रेक न्युज वृत्त :-ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन(IMA) महाराष्ट्र राज्य शाखेने राज्यव्यापी बंदची घोषणा...

गडचिरोली जिल्ह्यातील विविध विषयांवर आमदार मसरामांची मुख्य वनसंरक्षकांशी चर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी नुकतीच गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांची  सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील वने,वन्यजीव व शेतकऱ्यांशी संबंधित विविध...

जोरदार पावसाचा नवा अंदाज; पुढील पाच दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा सुधारित अंदाज वर्तविला होता.त्यानुसार,१५ जुलैपासून महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली.विशेषतः १६ जुलैपासून विदर्भात पावसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!